स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे चहाची गाळणी. काही घरांमध्ये स्टीलची गाळणी वापरण्यात येते. तर काही लोकं प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करतात. मात्र वारंवार वापर केल्याने चहाची गाळणी लवकर खराब होते आणि स्वच्छ करणे कठीण होते. चहाच्या गाळणीमध्ये अत्यंत बारीक तारा असतात (Tea Strainer). त्यामुळे चहाची पावडर त्यात अडकून राहते. सतत याचा वापर केल्याने चहाची गाळणी काळीकुट्ट तर होतेच, शिवाय घासणीने स्वच्छ करूनही लवकर साफ होत नाही. किंवा त्यातील काळेपणा दूर होत नाही (Cleaning Tips).
कधी कधी लोकांसमोर काळीकुट्ट गाळणीचा वापर करण्यास लाजिरवाणे वाटते. घासणीने घासूनही जर चहाची गाळणी स्वच्छ होत नसेल तर, आपण काही घरगुती गोष्टींचा वापर करून चहाची गाळणी चकचकीत स्वच्छ करू शकता(How to clean a tea strainer at home - 2 Easy Tips).
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स
पहिला उपाय
- चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी डिश वॉश, स्क्रबर आणि लिंबाचा रसाचा वापर करा. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. नंतर त्यात चहाची गाळणी पाण्यात भिजत ठेवा आणि गॅस बंद करा.
जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे
- यानंतर डिशवॉश आणि स्क्रबरच्या मदतीने चहाची गाळणी घासून धुवून घ्या. या पद्धतीने चहाची गाळणी स्वच्छ केल्यास झटपट साफ होईल.
दुसरा उपाय
- सर्वप्रथम लिक्विड सोप, व्हिनेगर आणि स्क्रबर घ्या. जर आपली चहाची गाळणी स्टीलची असेल तर गॅस बर्नरवर ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा. यामुळे चहाच्या गाळणीमधील अडकलेले कण जळतील.
साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती
- आता एका बाऊलमध्ये व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन मिक्स करा. यामध्ये चहाची गाळणी १० मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- १० मिनिटानंतर डिशवॉश आणि स्क्रबरच्या मदतीने चहाची गाळणी घासून धुवून घ्या.