वेळेला चहा (Tea Making) सर्वाना लागतो. काहींचा दिवस चहाशिवाय सुरु होत नाही. चहासाठी लागणारं साहित्य हे फार कमी असतं (Food). शिवाय चहा करण्यासाठी फक्त भांडं आणि चहाच्या गाळणीचा वापर होतो (Cleaning Tips). चहाचं भांडं आपण घासून स्वच्छ करू शकतो. पण चहाच्या गाळणीच्या सतत वापरामुळे त्यावर काळपट थर जमा होऊ लागतो.
एकदा गाळणी आणल्यानंतर ३-४ महिने आपण बदलत नाही. रोज चहा आपण पितो, तर रोज गाळणी त्या काळ्या पडू लागतात. एकदा गाळणी काळी पडायला सुरूवात झाली की ती जास्तच काळपट होत जाते आणि खराब दिसते. बऱ्याचदा घासूनही चहाची गाळणी अस्वच्छ राहते. जर घासूनही चहाच्या गाळणीचा काळपटपणा निघत नसेल तर, काही घरगुती उपायांची मदत घ्या. यामुळे मिनिटात चहाची गाळणी स्वच्छ होईल(How to clean a Tea Strainer in just 5 mins).
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी घरगुती टिप्स
लागणारं साहित्य
इनो
डिश वॉश लिक्विड
ब्रश
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
पाणी
अशा पद्धतीने करा चहाची गाळणी स्वच्छ
सर्वात आधी एक प्लेट घ्या. त्यावर चहाची गाळणी ठेवा. चहाची गाळणी उलट्या बाजूने ठेवा. त्यावर एक इनो पॅकेट ओता. आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. इनो पावडर संपूर्ण गाळणीवर पसरवा. नंतर त्यावर लिंबाचा रस पसरवा.
जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट
१० मिनिटांसाठी तसेच ठेवा. गाळणी जर अधिक काळीकुट्ट झाली असेल तर, १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर त्यावर डिश वॉश लिक्विड पसरवा. आणि जुन्या टूथब्रशने चहाची गाळणी स्वच्छ करा. आता पाणी घ्या. आणि चहाची गाळणी स्वच्छ करा.