Join us  

ब्रशचा वापर न करता टॉयलेट साफ करा, पांढऱ्या पावडरचा करा 'असा' वापर; मिनिटात टॉयलेट स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 10:00 AM

How to clean a toilet: here are our homemade tips! : टॉयलेटमधील पिवळे आणि हट्टी डाग ब्रशने घासल्याशिवाय निघतच नाही?

आठवडाभर टॉयलेट साफ न केल्यास प्रचंड घाण दिसते (Cleaning tips). पिवळट डागांमुळे टॉयलेटमध्ये प्रचंड दुर्गंधीही पसरते. अशावेळी टॉयलेट साफ करताना आपल्याला घामही फुटतो (Toilet Cleaning). कारण टॉयलेटमधले पिवळट डाग ब्रशने घासूनही निघत नाही. त्यामुळे वेळीच टॉयलेट साफ करणं गरजेचं आहे.

अनेकदा या घाणीमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. जर टॉयलेटचे पिवळट डाग घासूनही निघत नसेल तर, सायट्रिक ऍसिडचा वापर करून पाहा. सायट्रिक ऍसिडमुळे टॉयलेटचे पिवळट डाग स्वच्छ होतील. शिवाय बॅक्टेरियाही नष्ट होतील. सायट्रिक ऍसिडचा वापर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी नेमका कसा करता येईल? पाहूयात(How to clean a toilet: here are our homemade tips!).

आंघोळ करण्यापूर्वी केसांना 'या' पद्धतीने लावा बटाट्याचा रस, केस वाढतील भराभर-मैत्रिणी विचारतील सिक्रेट

सायट्रिक ऍसिडचा वापर करून टॉयलेट कसे स्वच्छ करता येईल?

- टॉयलेट साफ करण्यासाठी आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर पाणी टॉयलेटमध्ये टाका.

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

- टॉयलेटमध्ये कोमट पाणी टाकल्यानंतर त्यात सायट्रिक ऍसिड शिंपडा. काही वेळेसाठी तसेच राहू द्या. यामुळे पिवळट डाग ब्रशने साफ करता निघतील.

- सायट्रिक ऍसिडच्या मदतीने, आपल्याला ब्रशने तासनतास शौचालय घासण्याची गरज नाही. पण जर काही डाग उरले असतील तर, ब्रशने स्वच्छ करा. आता पाण्याने टॉयलेट स्वच्छ करा. काही मिनिटात आपल्याला चमकतं टॉयलेट पाहायला मिळेल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल