Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेट घासूनही पिवळट डाग तसेच राहतात? ९ रुपयांच्या इनोने करा स्वच्छ; दुर्गंधीमुक्त टॉयलेटचं सिक्रेट

टॉयलेट घासूनही पिवळट डाग तसेच राहतात? ९ रुपयांच्या इनोने करा स्वच्छ; दुर्गंधीमुक्त टॉयलेटचं सिक्रेट

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes : टॉयलेट सीटमध्ये इनोची पावडर शिंपडल्याने स्वच्छ होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 02:45 PM2024-03-20T14:45:03+5:302024-03-21T08:31:25+5:30

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes : टॉयलेट सीटमध्ये इनोची पावडर शिंपडल्याने स्वच्छ होते?

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes | टॉयलेट घासूनही पिवळट डाग तसेच राहतात? ९ रुपयांच्या इनोने करा स्वच्छ; दुर्गंधीमुक्त टॉयलेटचं सिक्रेट

टॉयलेट घासूनही पिवळट डाग तसेच राहतात? ९ रुपयांच्या इनोने करा स्वच्छ; दुर्गंधीमुक्त टॉयलेटचं सिक्रेट

घरातली साफसफाई करताना बऱ्याचदा टॉयलेट (Toilet Cleaning) आणि बाथरूम साफ करायला आपण विसरतो किंवा वेळ मिळत नाही. पण नियमित किंवा आठवड्यातून एकदा टॉयलेट साफ करणं गरजेचं आहे. आपण घरातले इतर भाग जसे स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे टॉयलेट देखील स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. पण अनेकदा टॉयलेट साफ करण्याचा कंटाळा येतो. टॉयलेटच्या आतील पिवळट डाग घासूनही निघत नाही.

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण मार्केटमधील केमिकल उत्पादनांचा वापर करतो. पण याने देखील टॉयलेट चकचकीत स्वच्छ होईलच असे नाही (Cleaning Tips and Tricks). टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण इनोचा वापर करून पाहू शकता. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी आपण इनोचा वापर करतो. याच्या वापराने आपण टॉयलेट देखील स्वच्छ करू शकता. इनोच्या वापरामुळे टॉयलेट स्वच्छ होईल, डाग निघतील शिवाय दुर्गंधीही येणार नाही(How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes).

टॉयलेट साफ करण्यासाठी इनोचा वापर कसा करावा?

बऱ्याचदा बाथरूम किंवा टॉयलेट साफ करताना क्लिनिंग करणारे उत्पादने संपतात, किंवा त्याच्या वापराने विशेष फरक दिसून येत नाही. जर आपल्याला टॉयलेट चकचकीत स्वच्छ करायचं असेल तर, एकदा इनोच्या वापराने टॉयलेट स्वच्छ करा. याच्या वापराने फक्त टॉयलेट नसून, फरशी, बेसिन आणि बाथरूम देखील स्वच्छ होऊ शकते.

पोतंभर गहू आणले, पण कीड लागलं तर? ७ टिप्स-वर्षभर गव्हाला कीड लागणार नाही

- टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण एक्सपायरी इनोचा वापर करू शकता. यासाठी टॉयलेटच्या आतील बाजूस इनो पावडर शिंपडून काही वेळासाठी ठेवा.

- आता एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

- काही वेळानंतर तयार पाणी टॉयलेटमध्ये ओतून ब्रशने घासून काढा.

- ब्रशने घासून घेतल्यानंतर टॉयलेट पाणीने स्वच्छ करा.

इनोच्या वापराने आणखीन काय स्वच्छ होईल?

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

बऱ्याचदा बेसिनमध्ये पिवळट डाग दिसू लागतात, शिवाय बाथरूम देखील घाण होते. पाण्याचे डाग सहसा लवकर निघत नाही. आपण ज्याप्रमाणे इनोच्या वापराने टॉयलेट स्वच्छ केले, त्याचप्रमाणे बेसिन आणि बाथरूम देखील स्वच्छ करू शकता. अगदी १५ मिनिटात बेसिन आणि बाथरूम देखील स्वच्छ होईल..

Web Title: How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.