Lokmat Sakhi >Social Viral > घासले तरी टॉयलेट पिवळेच? १० रुपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर; मिनिटांत टॉयलेट क्लिन - दिसेल चकाचक

घासले तरी टॉयलेट पिवळेच? १० रुपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर; मिनिटांत टॉयलेट क्लिन - दिसेल चकाचक

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes! use alum for this : तुरटीने टॉयलेट स्वच्छ करण्याची पाहा सोपी युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 10:00 AM2024-10-14T10:00:00+5:302024-10-14T10:00:02+5:30

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes! use alum for this : तुरटीने टॉयलेट स्वच्छ करण्याची पाहा सोपी युक्ती

How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes! use alum for this | घासले तरी टॉयलेट पिवळेच? १० रुपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर; मिनिटांत टॉयलेट क्लिन - दिसेल चकाचक

घासले तरी टॉयलेट पिवळेच? १० रुपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर; मिनिटांत टॉयलेट क्लिन - दिसेल चकाचक

दिवाळी (Diwali) सण जवळ आल्यानंतर सर्वात आधी आपण साफसफाईच्या कामाला लागतो (Toilet Cleaning Tips). घराची सफाई करताना शेवटी आपण बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करतो (Cleaner). काही जण आठवड्याला टॉयलेट स्वच्छ करतात. पण काही जण महिनोमहिने टॉयलेट स्वच्छ करत नाही. ज्यामुळे टॉयलेटमध्ये पिवळट डाग तयार होतात (Social Viral).

हे पिवळट डाग सहसा घासूनही निघत नाही. महिनोमहिने न घासल्यामुळे टॉयलेटमधील बॅक्टेरिया घरभर पसरतात. ज्यामुळे गंभीर आजारांचाही धोका वाढतो. घर कितीही साफ असेल आणि टॉयलेट घाणेरडं असेल तर पाहूण्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते. टॉयलेट जर क्लीनरनेही स्वच्छ होत नसेल तर, तुरटीचा वापर करून पाहा. अगदी काही मिनिटात टॉयलेट स्वच्छ होईल(How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes! use alum for this).

मेहेंदी लावतानाच त्यात मिसळा 'ही' चमचाभर पावडर; ५ आठवडे केस पांढरे होणार नाहीत

तुरटी आणि बेकिंग सोडा

टॉयलेटमधील घाण स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी आणि बेकिंग सोड्याचा वापर करून पाहू शकता. सर्वप्रथम एका मगमध्ये अर्धा लिटर पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा आणि तुरटी पावडर मिक्स करा. तयार मिश्रण टॉयलेटमध्ये ओता. १० मिनिटांसाठी तसेच ठेवा. यानंतर ब्रशच्या मदतीने पिवळे डाग स्क्रब करा, आणि पाणी ओतून क्लिन करा. थोड्याच वेळात टॉयलेट नव्यासारखे चमकतील.

तुरटी आणि पाणी

आपण तुरटी आणि पाण्याचा वापर करूनही टॉयलेट स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी आणि तुरटी पावडर घालून मिक्स करा. तयार मिश्रण टॉयलेटमध्ये ओता. १० - १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर ब्रशच्या मदतीने टॉयलेट स्वच्छ करा. यामुळे मिनिटात टॉयलेट चकाचक होईल.

सकाळी पोट साफ होत नाही? चपाती खाऊन पोट डब्ब होतं? कणकेत मिसळा '१' पिवळी पावडर; चपात्या होतील मऊ

तुरटी आणि लिंबाचा रस

तुरटीमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने टॉयलेटवर साचलेला पिवळा थर निघून जातो. यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घ्या, त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. नंतर त्यात तुरटी पावडर घालून मिक्स करा. सर्व मिश्रण टॉयलेटमध्ये ओता. काही वेळानंतर ब्रशने टॉयलेट स्वच्छ करा. मिनिटात टॉयलेट स्वच्छ होईल. 

Web Title: How to Clean a Toilet in Less Than 3 Minutes! use alum for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.