Lokmat Sakhi >Social Viral > Diwali Cleaning Tips : हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट

Diwali Cleaning Tips : हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट

Diwali Cleaning Tips How to clean a toilet without using your hands : जेव्हाही तुम्हाला टॉयलेट साफ करायचे असेल  तेव्हा या गोळ्यांचा वापर करा. एक गोळी घेऊन फॉईल पेपरमध्ये गोलाकार रॅप करून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:40 PM2023-10-08T13:40:07+5:302023-11-01T17:54:29+5:30

Diwali Cleaning Tips How to clean a toilet without using your hands : जेव्हाही तुम्हाला टॉयलेट साफ करायचे असेल  तेव्हा या गोळ्यांचा वापर करा. एक गोळी घेऊन फॉईल पेपरमध्ये गोलाकार रॅप करून घ्या.

How to clean a toilet without using your hands : How to Clean a Toilet the Right Way | Diwali Cleaning Tips : हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट

Diwali Cleaning Tips : हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट

आपण घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी घरातील काही भाग असे असतात जे नेहमी अस्वच्छ वाटतात. (Diwali Home Cleaning Tips)जसं की टॉयलेट, बाथरूम कितीही साफ सफाई केली तरी रोजच्या वापरामुळे घरातील टॉयलेट बाथरूम अस्वच्छ दिसतात तर कधी दुर्गंध येतो. अनेकांना हाताने टॉयलेटच्या भिंती, पॉट स्वच्छ करण्याची किळस वाटते. (How to Keep a Toilet Bowl Clean Without Scrubbing)

अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही हात न लावता टॉयलेट अगदी चकचकीत स्वच्छ करू शकता. (How to Clean a Toilet the Right Way) टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकींग सोडा घ्या त्यात एक चमचा मीठ घाला, त्यात लिंबू पिळा आणि टुथपेस्ट घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी यात हार्पिक घाला. (How to Clean a Toilet without Touching it)

त्यानंतर पुन्हा एकत्र करून या  मिश्रणाचे लहान  लहान गोळे बनवून घ्या. हे गोळे समान आकाराच्या लहान झाकणांमध्ये घाला आणि फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. १ तासाने हे गोळे काढून घ्या आणि एका डब्यात भरून ठेवा.

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...

जेव्हाही तुम्हाला टॉयलेट साफ करायचे असेल  तेव्हा या गोळ्यांचा वापर करा. एक गोळी घेऊन फॉईल पेपरमध्ये गोलाकार रॅप करून घ्या. घट्ट बंद केल्यानंतर सुई किंवा टोकदार वस्तूच्या मदतीने फॉईल पेपरवर छिद्र पाडा आणि याला एक दोरा बांधून टॉयलेट टँकमध्ये ठेवा. जेव्हाही तुम्ही फ्लश कराल तेव्हा हे मिश्रण पाण्याबरोबर खाली येईल.

सोडा

सोडा वापरून तुम्ही टॉयलेट सीट स्वच्छ करू शकता. हे एक उत्तम क्लिनिंग एजंट आहे. याच्या वापराने तुम्हाला कमी वेळेत चांगला परिणाम दिसेल.  यासाठी तीन ते चार चमचे सोडा अर्धा कप पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. डाग असलेल्या ठिकाणी लावून अर्ध्या तासासाठी तसेच ठेवून द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने टॉयलेट स्वच्छ करा. या उपायाने डाग दूर होण्यास मदत होईल.

ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

क्लिनिंग टॅबलेट

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी टॅबलेट हा उत्तम पर्याय आहे.  क्लिनिंग टॅबलेट बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर किटाणू दूर होण्यास मदत होते. टॉयलेट टँकमध्ये ही टॅबलेट तुम्ही  घालू शकता. यासाठी तुम्हाला ब्रशचा वापर करण्याची गरज नाही.

Web Title: How to clean a toilet without using your hands : How to Clean a Toilet the Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.