Join us  

पाण्याच्या बाटल्या आतून कळकट झाल्या? कोमट पाण्याचा सोपा उपाय; काही मिनिटात दिसतील नव्यासारखे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2024 2:03 PM

How to Clean a Water Bottle to Prevent Germs : कोमट पाण्यात मिसळा काही गोष्टी; १० मिनिटात बाटल्या होतील चकचकीत स्वच्छ

प्रत्येक घरात पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो. उन्हाळ्यात सतत तहान लागते, म्हणून शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी सतत पीत राहणे गरजेचं. शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये आपण बऱ्याचदा प्रवास करतानाही बॉटलचा (Water Bottle) वापर करतो. पण बॉटलच्या सततच्या वापरामुळे लवकर खराब होतात, किंवा आतून कळकट होतात (Plastic Bottle).

नियमितपणे बॉटल स्वच्छ नाही केल्यास त्यात बॅक्टेरियाची वाढ होते. त्यात पाणी घालून प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शिवाय पोटाचेही विकार वाढतात. त्यामुळे वेळोवेळी बाटल्या स्वच्छ करणं गरजेचं (Cleaning Tips). बाटल्या आतून स्वच्छ करणं अवघड. जर मेहनत घेऊनही बाटल्या आतून स्वच्छ होत नसतील तर, कोमट पाण्याने स्वच्छ करा. बाटल्या चकचकीत स्वच्छ करण्यासाठी कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील पाहूयात(How to Clean a Water Bottle to Prevent Germs).

प्लास्टिकच्या बाटल्या आतून खराब होऊ नये म्हणून..

- प्लास्टिकच्या बाटल्या डीप क्लिन करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. नियमित कोमट पाण्याचा वापर करून बॉटल धुतल्याने कायम स्वच्छ राहतात.

साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय

बॉटल डीप क्लिन करण्यासाठी उपाय

लागणारं साहित्य

डिश लिक्विड

कास्टिक सोडा

लिंबाचा रस

व्हिनेगर

हायड्रोजन पेरोक्साइड

स्पंज

कोमट पाणी

बाटली स्वच्छ करण्याची पद्धत

मेहनत न घेता बॉटल स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे डिश लिक्विड, कास्टिक सोडा, लिंबाचा रस, व्हीनेगर, हायड्रोजन पेरोक्साइड आणि कोमट पाणी घालून मिक्स करा. तयार पाण्यात बॉटल आणि झाकण काही वेळासाठी ठेवा. यामुळे बॉटलच्या आत तयार झालेल्या बॅक्टेरिया नष्ट होतील. शिवाय स्पंजने निघून जातील. नंतर कोमट पाण्याने बॉटल आणि झाकण धुवून घ्या.

तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही..

बॉटल दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिप्स

- आठवड्यातून किमान एकदा प्लास्टिकची बॉटल कोमट पाण्याने धुवा.

- केमिकल रसायने किंवा प्लास्टिकला नुकसान करणाऱ्या हानिकारक गोष्टींचा वापर टाळा.

- बाटली वारंवार घाण होत असेल किंवा त्यातून दुर्गंधी येत असेल तर, दुसऱ्या बॉटलचा वापर करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया