Join us  

कुकरच्या झाकणाला पडलेले पिवळे चिकट तेलकट डाग काढण्याचे २ सोपे उपाय, झाकण होईल नव्यासारखे चकचकीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 1:32 PM

Easy Tips To Clean Old Yellow Stains On Cooker Lid : कुकरच्या झाकणावरचे हळद - तेलाचे चिकट डाग काढण्यासाठी २ भन्नाट ट्रिक्स...

किचनमधील सगळ्या भांड्यांमध्ये 'प्रेशर कुकर' चा वापर दररोज केला जातो. डाळ, भात, भाजी, आमटी असे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. कुकरचा वापर रोज करत असल्याने त्याच्या स्वच्छतेची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. कुकर वापरल्यानंतर आपण तो प्रत्येकवेळी स्वच्छ धुवून ठेवतोच. कुकरमध्ये अनेक पदार्थ तयार करताना ते चांगले शिजण्यासाठी आपण त्यात पाणी घालतो. काहीवेळा हे पाण्याचे प्रमाण जास्त होते. अशावेळी हे पाणी कुकरच्या झाकणातून ज्या भागात शिट्टी असते त्या भागातून लिक होत. असा पाण्याचा थर कुकरच्या झाकणावर साचून राहतो(How to clean a yellow stained pressure cooker).

काहीवेळा आपण कुकरमधील पदार्थांमध्ये हळद किंवा इतर मसाले घालतो. जेव्हा कुकरच्या झाकणातून पाणी लिक होते तेव्हा हे मसाले देखील बाहेर येऊन कुकरच्या झाकणांवर साचून राहतात. अशा परिस्थितीत, जर हे कुकरचे झाकण वेळोवेळी नीट स्वच्छ केले नाही तर ते खराब दिसू लागते. कुकरच्या झाकणावर चिकट तेलकट डाग तसेच राहतात. हे डाग घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो तरी देखील हे हट्टी डाग निघत नाहीत. अशावेळी आपण काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुन कुकरच्या झाकणावरील हे डाग अतिशय सहज काढू शकतो(Easy Tips To Clean Old Yellow Stains On Cooker Lid).

कुकरच्या झाकणावरील चिकट - तेलकट डाग कसे काढावेत ? 

१. टूथपेस्ट :- टूथपेस्टच्या मदतीने आपण कुकरच्या झाकणावरील चिकट, तेलकट डाग अगदी सहज पद्धतीने काढू शकतो. यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळवून घ्यावे. या गरम पाण्यात १ टेबलस्पून मीठ घालावे. हे मीठ पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. या पाण्यांत कुकरचे भांडे १० ते १५ मिनिटे संपूर्णपणे बुडवून ठेवावे. आता कुकरचे झाकण घेऊन त्याचा रबर व शिट्टी काढून घ्यावी. त्यानंतर ब्रशच्या मदतीने कुकरच्या झाकणाला टूथपेस्ट लावून घ्यावी. टूथपेस्ट लावून झाल्यावर कुकरचे झाकण २० ते २५ मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर ब्रशच्या मदतीने कुकरचे झाकण घासून घ्यावे. कुकरचे झाकण जर फारच खराब झाले असेल तर ही प्रक्रिया २ ते ३ वेळा करावी. त्यानंतर कुकरचे झाकण लिक्विड डिशवॉश आणि पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावे.   

नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

बाहेरून चांगली दिसणारी वांगी आतून खराब निघतात ? वांगी खरेदी करताना लक्षात ठेवा ५ सोप्या टिप्स...

२. बेकिंग सोडा आणि लिंबू :- कुकरच्या झाकणावरचे हट्टी डाग घालवण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करु शकता. एका मोठ्या बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट टूथब्रशच्या मदतीने कुकरच्या झाकणावर लावून घ्यावी. त्यानंतर हे झाकण १० ते १५ मिनिटांसाठी असेच ठेवून द्यावे. त्यानंतर या झाकणावर हळुहळु गरम पाणी ओतावे. आता लिक्विड सोपं आणि घासणीच्या मदतीने हे झाकण घासून घ्यावे. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा आपण हा उपाय करु शकता. यामुळे कुकरच्या झाकणावरील चिकट तेलकट डाग अगदी सहजपणे निघून जातील आणि कुकरचे झाकण पुन्हा नव्यासारखे चमकू लागेल.

नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स