Join us  

How to Clean Air Cooler at Home : कूलरमधून सतत पाणी गळतं? ३ ट्रिक्स वापरा; पाणी गळणं बंद होऊन कुलर नेहमी दिसेल स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 4:10 PM

How to Clean  Air Cooler at Home : जसजसा कूलर जुना होतो, तसतसं कूलरमध्ये अनेक समस्या येऊ लागतात, जसे की कूलरचा पंखा संथ गतीने चालतो किंवा कूलरची टाकी गळायला लागते.

उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरात एसी, पंखे, कूलर या उपकरणांचा जास्त वापर सुरू होतो. मात्र, आता उष्णता इतकी वाढू लागली आहे की, आता बहुतांश लोकांनी घरांमध्ये एसी लावायला सुरुवात केली आहे, पण तरीही अनेक घरांमध्ये कूलरचा वापर केला जातो. (Easy Home Cleaning Tips) कारण प्रत्येकाला एसी परवडत नाही आणि कूलर कमी खर्चात जास्त गार आणि थंड हवा देण्याचे काम करतो. अर्थात, दरवर्षी उन्हाळ्यात तुम्ही नवीन कूलर खरेदी करणार नाही. (Air Cooler Cleaning and Maintain at Your Home)

पण जसजसा कूलर जुना होतो, तसतसं कूलरमध्ये अनेक समस्या येऊ लागतात, जसे की कूलरचा पंखा संथगतीने चालतो किंवा कूलरची टाकी गळायला लागते.  मात्र, अनेकवेळा नवीन कूलरची टाकी देखील गळू लागते, जर तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कूलरचे लिकेज कमी करू शकता. (Cooler tank leakage repairing tips)

एपॉक्सी पुट्टीचा वापर

जर तुमची कूलरची टाकी मोठ्या भागातून गळत असेल, तर तुम्ही तुमची संपूर्ण कूलर टाकी इपॉक्सी पुटीने झाकून ठेवू शकता.  यामुळे तुमच्या कुलरची गळती थांबेल. ही पुट्टी तुम्हाला बाजारात सहज मिळेल. ती वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम कूलर रिकामा करा आणि तो कोरडा करा आणि नंतर एका भांड्यात इपॉक्सी पुट्टी ठेवा. नंतर मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर गळती असलेल्या जागेवर लावा. याव्यतिरिक्त, आपण एपॉक्सी पुट्टीनं टाकी पूर्णपणे झाकू शकता. नंतर टाकी कोरडी होऊ द्या, काहीवेळानंतर तुमचा कूलर पूर्णपणे सेट होईल.  तुम्ही टाकीमध्ये पाणी घालून तपासू शकता.

उन्हाळ्यात हळदीचं दूध प्यायचं की नाही? चांगल्या तब्येतीसाठी डॉक्टरांनी सांगितले हळदीच्या दूधाचे फायदे, तोटे

वॉटरप्रुफ टेपचा वापर करा

जर कूलरला जास्त गळती होत नसेल किंवा टाकीला छिद्र असेल, तर तुम्ही गळती थांबवण्यासाठी वॉटरप्रूफ टेप किंवा MC वापरू शकता. ही टेप तुम्हाला बाजारात किंवा कोणत्याही दुकानात सहज मिळेल. ते वापरण्यासाठी, प्रथम टाकी पूर्णपणे कोरडी करा आणि टेपच्या मदतीने गळतीची जागा पूर्णपणे झाकून टाका.  दोन्ही बाजूंनी म्हणजे आतून आणि बाहेरून झाकून ठेवू शकता. यामुळे तुमचा कूलर लिक होणार नाही आणि तुम्हाला जास्त पैसेही लागणार नाहीत. याव्यतिरिक्त, आपण छिद्रावर एमसील रबर किंवा चिकणमाती देखील लावू शकता.

उन्हाळ्यात महिलांना गंभीर युरिन इन्फेक्शनचा धोका; 4 चुका- लघवीचे आजार हमखास

तुमची कूलरची टाकी जास्त काळ टिकवायची असेल तर तुम्ही टाकीच्या आतील बाजूस रंगवू शकता. यामुळे तुमची कूलरची टाकी केवळ नवीनच दिसणार नाही तर गळतीपासूनही वाचेल. कारण वॉटर पेंट कूलरमधील छिद्र भरण्याचे काम करेल आणि नंतर कूलर टपकणं बंद होईल. टाकीच्या आतील बाजू दोन ते तीन वेळा रंगवू शकता.

टँक बदलू शकता

कूलर नवीन असेल पण त्याची टाकी खराब होऊ लागली असेल किंवा खूप गळत असेल तर तुम्ही कूलर बदलण्याऐवजी टाकी बदलू शकता. या सर्व युक्त्या करूनही कुलरची गळती थांबत नसेल, तर तुम्ही बाजारातून डिझाइन केलेली नवीन टाकी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कूलरचा आकार दुकानदाराला दाखवावा लागेल. मग तुम्हाला त्याप्रमाणे नवीन टाकी बनवून मिळेल. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन