थंडीच्या दिवसात अनेक जण गरम पाण्याने आंघोळ करतात. थंडीमुळे अनेकांना थंड पाण्याने आंघोळ करणं अशक्य होते. त्यामुळे गरम पाण्यासाठी बरेच जण घरात गीजर लावतात. परंतु ज्यांना गीजर लावणे शक्य नाही, असे नागरिक वॉटर हिटर रॉडचा वापर करतात. वॉटर हिटर रॉड सहसा लवकर खराब होत नाही. पण त्याचा अधिक काळ वापर केल्याने, त्यावर पांढरा थर जमा होऊ लागतो. त्यावरील घाण वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे.
कारण जमा झालेली घाण साफ केली नाहीतर, वॉटर हिटर रॉड पाणी गरम करण्यास अधिक वेळ घेऊ शकते. ज्यामुळे आपले लाईट बिल जास्त येते. वॉटर हिटर रॉड नेमकं साफ कसं करावे? वॉटर हिटर रॉड साफ करताना शॉक तर बसणार नाही ना? वॉटर हिटर रॉड साफ करण्याची सोपी ट्रिक कोणती? पाहा(How to Clean an Electric Water Heater).
प्लास्टिकच्या बादलीत करा पाणी गरम
काही लोक स्टील आणि जर्मनच्या बादलीत पाणी गरम करतात. या बादल्यांमध्ये वॉटर हीटर रॉड टाकल्यानंतर शॉक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्टील आणि जर्मनच्या बादल्यांचा वापर टाळा, व त्याजागी प्लास्टिक बादल्यांचा वापर करा.
मळकट-चिकट टाईल्समुळे किचनची शोभा कमी झाली? लिंबाचे २ उपाय, मेहनत न घेता-टाईल्स होतील चकाचक
वॉटर हिटर रॉड साफ करण्याची योग्य पद्धत
व्हिनेगर
व्हिनेगरचा वापर फक्त जेवणासाठी करण्यात येत नसून, अनेक वस्तू स्वच्छ करण्यासाठीही होतो. आपण व्हिनेगरचा वापर वॉटर हिटर रॉड साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी एका बादलीत व्हिनेगर घाला. त्यात ४ ते ५ तासांसाठी वॉटर हिटर रॉड घालून ठेवा. यामुळे न घासता वॉटर हिटर रॉड स्वच्छ होईल. नंतर पाण्याने वॉटर हिटर रॉड धुवून घ्या.
किचन सिंक सतत तुंबते? बेकिंग सोड्याचा १ भन्नाट उपाय, प्लंबरला बोलावण्यची गरजही पडणार नाही..
हायड्रोजन पेरॉक्साइड
वॉटर हिटर रॉड साफ करण्यासाठी आपण हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करू शकता. यासाठी एका बादलीत २ लिटर पाणी घ्या, त्यात ५ चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड घालून मिक्स करा. नंतर त्यात वॉटर हिटर रॉड ५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. शेवटी सॅण्डपेपरने रॉड घासून काढा.