Lokmat Sakhi >Social Viral > फक्त २ मिनिटात गंजलेली इस्त्री दिसेल नवी; १ सोपी ट्रिक, जळलेले डाग निघून इस्त्री होईल स्वच्छ

फक्त २ मिनिटात गंजलेली इस्त्री दिसेल नवी; १ सोपी ट्रिक, जळलेले डाग निघून इस्त्री होईल स्वच्छ

How to Clean an Iron in 4 Easy Steps : कोणतंही कापड इस्त्रीला चिकटल्यानंतर इस्त्रीला वास येतो आणि लालसर डाग तसेच राहतात. इस्त्रीचे डाग काढण्याचे सोपे उपाय पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:33 AM2023-06-07T08:33:00+5:302023-06-07T11:02:47+5:30

How to Clean an Iron in 4 Easy Steps : कोणतंही कापड इस्त्रीला चिकटल्यानंतर इस्त्रीला वास येतो आणि लालसर डाग तसेच राहतात. इस्त्रीचे डाग काढण्याचे सोपे उपाय पाहूया.

How to Clean an Iron in 4 Easy Steps : How to Clean Iron Press Tips and Tricks | फक्त २ मिनिटात गंजलेली इस्त्री दिसेल नवी; १ सोपी ट्रिक, जळलेले डाग निघून इस्त्री होईल स्वच्छ

फक्त २ मिनिटात गंजलेली इस्त्री दिसेल नवी; १ सोपी ट्रिक, जळलेले डाग निघून इस्त्री होईल स्वच्छ

रोज वापरण्याचे कपडे प्रेस करण्यासाठी लॉन्ड्रिंत देण्याऐवजी अनेकजण घरीच हे काम करतात.  इस्त्री कधी खराब होते तर कधी गंज लागतो. इस्त्री  करताना अनेकदा पाणी लागल्यानं गंज बसतो. वस्तूला एकदा गंज लागला की निघता निघत नाही.  (How to Clean an Iron in 4 Easy Steps) कोणतेही घट्ट डाग लावल्याशिवाय काहीजण वस्तू साफ करत नाहीत.  इस्त्रीला गंज लागल्यानंतर तो काढण्याचे सोपे उपाय पाहूया. कोणतंही कापड इस्त्रीला चिकटल्यानंतर इस्त्रीला वास येतो आणि लालसर डाग तसेच राहतात. इस्त्रीचे डाग काढण्याचे सोपे उपाय पाहूया. (Easy Ways to Clean an Iron)

पॅरासिटामॉलचा उपयोग होईल

तापासाठी वापरली जाणारी पॅरासिटामॉल जळलेली इस्त्री दुरूस्त करण्यासाठी फायदेशीर ठरते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लांब पॅरासिटामॉल घ्यावी लागेल. इस्त्री स्वच्छ करण्यासाठी एक मोठं कापड घ्या. हे काळजीपूर्वक करावे लागेल.  मुलांना यापासून दूर ठेवा.

सर्व प्रथम, दाबून पुसा. आता पॅरासिटामॉलची गोळी काठावरुन धरा आणि प्रेसवर घासणे सुरू करा. यानंतर कापडाने स्वच्छ करा. पुन्हा प्रेस लाईट करा आणि ही प्रक्रिया पुन्हा करत रहा. तुम्हाला प्रेसमधून जळलेल्या खुणा निघालेल्या दिसतील. आपले हात सुरक्षित राहतील याची खात्री करा आणि घाण पुसत राहा.

बेकिंग सोडा आणि पाणी

हा उपाय सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एक चमचा पाण्यात २ चमचे भरून बेकींग सोडा  घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट रबरच्या चमच्याच्या मदतीनं इस्त्रीवर लावा. २ ते ३ मिनिटं तसंच ठेवल्यानंतर  ओल्या कापडानं इस्त्री स्वच्छ करा. आता इस्त्री गरम करून कापडावर चालवून पाहा.  जेणेकरून नंतर बेकींग सोडा इतर कपड्यांवर लागणार नाही.

चूना आणि मीठ

इस्त्रीवरील गंज काढण्यासाठी चुना आणि मीठ वापरले जाऊ शकते. यासाठी एका भांड्यात मीठ आणि चुना समप्रमाणात घेऊन पाण्याने पेस्ट बनवा. ही पेस्ट रस्टी आयर्नवर लावा आणि काही वेळ ठेवल्यानंतर कापडाने स्वच्छ करा. गंज काढण्यासाठी प्रेसला सॅण्डपेपरने हलके चोळा. जेणेकरून गंजाचा वरचा थर निघून जाईलआणि व्यवस्थित इस्त्री करू शकाल.

Web Title: How to Clean an Iron in 4 Easy Steps : How to Clean Iron Press Tips and Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.