किचनमधील काही भांडी, उपकरणं वस्तू यांचा वापर काही विशिष्ठ गोष्टींसाठी केला जातो. किचनमध्ये रोज लागणारी भांडी आपण स्वच्छ धुवून ती वाळायला ठेवतो. धुतलेल्या या भांड्यांमधील पाणी निथळून जाण्यासाठी आपण ही भांडी टबमध्ये किंवा जाळी असणाऱ्या बास्केटमध्ये ठेवतो. सगळ्यांच्या घरांत अशी भांडी ठेवण्यासाठी असा एक मोठा टब किंवा बास्केट असते. हा टब प्लॅस्टिक,अल्युमिनियम, किंवा स्टीलचा असतो. आपण किचनमधील धुतलेली भांडी या टबमध्ये तर ठेवतो पण हा टब फारसा स्वच्छ करत नाही. धुतलेली भांडी ठेवायचा हा टब नेहमी स्वच्छ करण्या इतका पुरेसा वेळही नसतो. त्याचबरोबर यात रोज धुतलेली भांडी ठेवून त्यातील निथळलेल्या पाण्याने ही बास्केट खराब होऊ शकते(How to Clean Stainless Steel Baskets At Home).
शक्यतो धुतलेली भांडी ठेवण्यासाठीचे स्टीलचे मोठे बास्केट सगळ्यांकडेच असते. या स्टीलच्या बास्केटचा सतत पाण्याशी संपर्क येत असतो. यामुळे हे भांडे सतत पाणी लागून खराब होऊ शकते. असे हे स्टीलचे बास्केट खराब होऊ नये म्हणून त्याची स्वच्छता ठेवावी लागते. हे स्टीलचे बास्केट किंवा जाळी सारखे पाणी लागून खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी या भांड्याला लागलेली गंज काढणे कठीण होऊन बसते, यामुळे ते बास्केट अस्वच्छ दिसते. हे स्टीलचे बास्केट खराब झाले असेल तर त्याची स्वच्छता नेमकी कशी करावी यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करुयात(How to Clean and Maintain the Stainless Steel Baskets).
स्टीलचे बास्केट स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक...
साहित्य :-
१. मीठ २. व्हिनेगर ३. लिंबाचा रस ४. घासणी
नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही...
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅक मधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स...
कृती :-
१. एका लहान बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर, लिंबाचा रस घालून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. २. व्हिनेगर आणि लिंबाच्या रसात मीठ संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. ३. आता हे तयार द्रावण घासणीच्या मदतीने स्टीलच्या गंजलेल्या किंवा खराब झालेल्या भागांवर लावून घ्यावे. ४. घासणीच्या मदतीने ही स्टीलची बास्केट व्यवस्थित घासून घ्यावी. ५. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कापडाने पुसून उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्यावी.
अशाप्रकारे आपण रोज वापरात येणारी ही स्टीलची बास्केट अगदी सहज सोप्या पद्धतीने स्वच्छ करु शकतो.