Lokmat Sakhi >Social Viral > वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या

वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या

How to Clean and Maintain your Water Purifier at Home : वॉटर प्युरिफायर साफ करण्यासाठी मेकॅनिकला बोलवण्याची काहीही गरज नाही, घरीच करता येईल साफ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 01:47 PM2024-02-19T13:47:52+5:302024-02-19T13:49:17+5:30

How to Clean and Maintain your Water Purifier at Home : वॉटर प्युरिफायर साफ करण्यासाठी मेकॅनिकला बोलवण्याची काहीही गरज नाही, घरीच करता येईल साफ..

How to Clean and Maintain your Water Purifier at Home | वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या

वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या

पुण्यात मागील काही दिवसांपासून भयंकर प्रकार सुरु आहेत. कुठे डासांचा थयथयाट, तर कुठे वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या आढळणे. यामुळे प्रत्येक पुणेकर त्रस्त आहेत. सध्या वॉटर प्युरिफायरमध्ये लाल अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत हा प्रकार घडला असून, पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे प्युरीफायरमध्ये लाल अळ्या सापडल्या आहेत (Cleaning Tips).

वॉटर प्युरिफायर वेळेवर साफ करणं गरजेचं आहे. बराच काळ प्युरीफायर साफ न केल्यामुळे पाणी योग्यरित्या प्युरीफाय होत नाही (Water Purifier). दुषित पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे वॉटर प्युरिफायर साफ करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि मुख्य म्हणजे प्युरीफायर कधी साफ करावे? पाहूयात(How to Clean and Maintain your Water Purifier at Home).

यापद्धतीने करा वॉटर प्युरिफायर साफ

वॉटर प्युरिफायर स्वच्छ करण्यासाठी, प्रथम त्याचे सगळे स्वीच बंद करा. त्यातील फिल्टर कँडल काढून गरम पाण्यात ठेवून स्वच्छ करा. गरम पाण्याने स्वच्छ केल्याने वॉटर प्युरिफायर कँडलमध्ये अडकलेली सर्व घाण साफ होते. आता एका भांड्यात पाणी घ्या. त्यात एक चमचा डिटर्जंट मिसळा, तयार पाण्याने फिल्टर स्वच्छ करा.

जेवलं की आंबट ढेकर येतात? गॅसेसचा त्रास? आयुर्वेदाचार्य सांगतात-जेवल्यानंतर करा फक्त एक काम

प्युरीफायर साफ करण्याची योग्य पद्धत

फक्त फिल्टर नाही तर, आपण संपूर्ण प्युरीफायर स्वच्छ करू शकता. वॉटर प्युरिफायरवर अनेक डाग लागतात. हे हट्टी डाग लवकर निघत नाही. हे घालवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा. तयार पेस्ट फिल्टरच्या बाहेरील बाजूस लावा, व सुती कापडाने पुसून काढा.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घाला बर्फाचे तुकडे, पाहा जादू.. कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत

महिन्यातून एकदा आपण फिल्टर अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. अधिक काळ फिल्टर साफ न केल्यामुळे त्यात घाण साचू लागते. त्यमुळे महिन्यातून एकदा फिल्टर घरच्या घरी स्वच्छ करणे गरजेचं आहे.

Web Title: How to Clean and Maintain your Water Purifier at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.