Join us  

चांदीचे पैंजण काळे पडले, पण ऐन दिवाळीत कसे घालणार? ३ सोपे उपाय, दोन मिनिटांत चमकतील पैंजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 9:48 PM

How to Clean and Polish Silver Anklet : घरच्याघरी पैंजण -तोरड्या होतील स्वच्छ-चमकतील नव्यासारख्या

सणावाराच्या दिवसात (Diwali) बरेच जण ट्रेडीशनल कपडे परिधान करतात. ट्रेडीशनल कपड्यांवर ट्रेडीशनल ज्वेलरी शोभून दिसतात. सोन्याचा हार, बांगड्या, बाजूबंद, यासह चांदीचे पैंजण ट्रेडीशनल कपड्यांवर उठून दिसतात. पण पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे चांदीचे पैंजण लगेच काळपट पडतात.

काळपट पडलेले पैंजण दिसायला खूप खराब दिसतात (Cleaning Tips). पैंजण स्वच्छ करण्यासाठी आपण सराफाकडे देतो. त्यात खूप खर्चही होतो. सध्या दिवाळी जवळ आली आहे. जर आपल्याला सराफाकडे जायला वेळ नसेल तर, आपण घरीच पैंजण चमकवू शकता. फक्त ३ साहित्यांचा वापर करून आपण पैंजण स्वच्छ करू शकता(How to Clean and Polish Silver Anklet).

व्हाईट व्हिनेगर

चांदीचे दागिने किंवा पैंजण स्वच्छ करण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात व्हाईट व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात चांदीचे पैंजण १५ ते २० मिनिटांसाठी घालून भिजत ठेवा. नंतर ब्रशने पैंजण घासून घ्या, व पाण्याने धुवून घ्या.

माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

चहापत्ती आणि डिटर्जंट पावडर

चांदीचे दागिने किंवा पैंजण स्वच्छ करण्यासाठी आपण चहापत्ती किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा चहापत्ती घाला, पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात डिटर्जंट पावडर घालून मिक्स करा. त्यात चांदीचे पैंजण १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर ब्रशने चांदीचे पैंजण घासून काढा.

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर फक्त जेवणात होत असून, चांदीचे पैंजण चमकवण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चांदीच्या पैंजणावर लावून ठेवा. काही वेळानंतर ब्रशने पैंजण घासून काढा, मग पाण्याने धुवून घ्या. या उपायामुळे पैंजणावरील काळपट डाग निघून जाईल. 

टॅग्स :दिवाळी 2023स्वच्छता टिप्स