घरात शोभीकरणासाठी आपण वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू ठेवतो. प्रत्येकाला आपलं घर सजवण्याची इच्छा असते. आपलं घर सुंदर दिसावं, तसेच घराची शोभा अधिक वाढावी म्हणून आपण घर सजवतो. या शोभेच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या, फ्रेम्स, शोभेची आकर्षक फुलं, काही अँटिक पीस अशा अनेक गोष्टी असतात. काहीजणांना फुलं खूप आवडतात, या फुलांनी घर सजवायला खूप आवडत. हॉल, बेडरुम, डायनिंग टेबल यांसारख्या ठिकाणी आपण फ्लॉवर पॉट ठेवतो, या फ्लॉवर पॉट मध्ये आपण फुलं ठेवून घर सुशोभित करतो(How to Clean Artificial Flowers).
काहीवेळा आपण या फ्लॉवर पॉट मध्ये खरी फुलं (How to Clean Artificial Flowers at Home Just Like New) ठेवतो, तर कधी खोटी. प्रत्येकवेळी खरी फुलं ठेवणे शक्य नसते, अशावेळी आपण खोट्या फुलांचा वापर करतो. ही आर्टीफिशियल फुलं दिसायला तर सुंदर असतातच, परंतु या फुलांची विशेष अशी देखभाल देखील करावी लागत नाही. परंतु ही खोटी फुलं आपण दिवसेंदिवस तशीच ठेवतो. त्यामुळे त्यावर धूळ, माती चिकटून बसते. अशी आर्टिफिशियल फुलं कालांतराने खराब होतात. ही फुलं खराब झाली की ती चांगली दिसत नाही अशावेळी या फुलांवरील धूळ स्वच्छ करावी लागते. घरातील ही आर्टिफिशियल (how to clean dust from silk flowers easily) फुलं स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहुयात. ही ट्रिक वापरून आपण धूळखात पडलेली आर्टिफिशियल फ़ुले अगदी काही मिनिटांत पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ करु शकतो(How to clean artificial flowers & plants).
आर्टिफिशियल फुलं स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक...
साहित्य :-
१. शाम्पू - २ ते ३ टेबलस्पून २. गरम पाणी - १ टब
आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...
नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी...
कृती :-
१. सगळ्यात आधी एखाद कापड किंवा ब्रशच्या मदतीने फुलांवरील धूळ झटकून काढावी. २. सर्वप्रथम एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घ्यावे. ३. या गरम पाण्यात २ ते ३ टेबलस्पून शाम्पू घालून तो पाण्यांत मिक्स करून चांगला फेस करुन घ्यावा. ४. या तयार मिश्रणांत ही आर्टिफिशियल फुलं किमान तासभर तरी भिजत ठेवावीत. ५. त्यानंतर ही फुलं हलक्या हातांनी रगडून घ्यावीत. ६. आता एका टबमध्ये स्वच्छ पाणी घेऊन ही फुलं स्वच्छ पाण्यांने परत धुवून घ्यावीत. ७. त्यानंतर ही फुलं उन्हांत वाळवून घ्यावीत.
हाताला कणभर पीठ न लागता कणीक मळा, पाहा ही पीठ भिजवण्याची जादूई पिशवी...
अशाप्रकारे आपण शाम्पू व गरम पाणी या दोन गोष्टींचा वापर करून ही आर्टिफिशियल फुलं पुन्हा नव्यासारखी स्वच्छ करु शकता.