घरात असे अनेक वस्तू आहेत, ज्यांना गंज लगेच पकडते. त्यातीलच एक म्हणजे किचन आणि बाथरूममधील नळ. या नळांवर पाण्यामुळे अथवा साफ न केल्यामुळे गंज पकडते. हे नळ गंजून लगेच खराब होतात. हे गंजलेले नळ दिसायला अतिशय खराब दिसतात. काही लोकं गंजलेले नळ काढून नवीन नळ बसवतात. नवीन नळावर पैसे खर्च करण्यापेक्षा बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा.
बेकिंग सोडा फक्त पदार्थात वापरण्यात येत नसून, त्याचा वापर किचनमधील अनेक गोष्टींसाठी करता येतो. याच्या वापराने नळ अगदी चकाचक साफ होतील. अगदी दोन साहित्यात, फक्त १५ मिनिटात नळ नव्यासारखे चमकतील. ही भन्नाट ट्रिक आपण आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास नळ लवकर गंज पकडणार नाही(How to Remove Hard Water Stains from Your Bathroom Taps).
गंजलेले नळ साफ करण्यासाठी लागणारं साहित्य
व्हिनेगर
पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक
बेकिंग सोडा
ब्रश
स्क्रबर
अशा पद्धतीने साफ करा गंजलेले नळ
सर्वप्रथम, एक बाऊल घ्या. तो बाऊल स्टीलचा नसावा याची काळजी घ्यावी. आता त्या बाऊलमध्ये एक टेबलस्पून व्हिनेगर घ्या, त्यात दोन टेबलस्पून बेकिंग सोडा घालून पेस्ट तयार करा. मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच याचा वापर नळांवर करायचा आहे.
फक्त कांदाच नाही तर, कांद्याच्या सालीने देखील चमकेल करपलेलं भांडं, पाहा भन्नाट वापर
यासाठी एक वापरलेला जुना ब्रश घ्या. ब्रशच्या मदतीने पेस्ट नळांवर लावा. आपण हे मिश्रण बाथरूम टाईल्सवर देखील लावू शकता. जिथे नळांना जास्त गंज पकडला आहे, तिथे या पेस्टची गडद लेअर लावा. आता ही पेस्ट नळावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटं झाल्यानंतर त्यावर फेस दिसून येईल. फेस दिसल्यानंतर एका स्क्रबरच्या मदतीने नळ घासून काढायचे आहे.
फ्रिजमध्ये भरुन ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्याच्या ४ टिप्स, बाटली चकाचक झटपट
स्क्रबर घासण्यापूर्वी पाण्यात ओला करून घ्यायचा आहे. घासून झाल्यानंतर नळांना पाण्याने धुवून काढा. अशा प्रकारे जास्त मेहनत न घेता, दोन साहित्यात नळातील गंज सहज निघतील. व नव्यासारखे चमकतील. आपण याचा वापर आठवड्यातून दोन वेळा करू शकता.