Lokmat Sakhi >Social Viral > How to Clean Bathroom Tiles : बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स,  घर दिसेल चकचकीत 

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स,  घर दिसेल चकचकीत 

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम अशी जागा आहे जिथे सतत साबण आणि पाणी  वापरले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फक्त डिटर्जंट घेतला तर ते चांगले स्वच्छ होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:40 PM2022-07-17T16:40:14+5:302022-07-17T16:56:57+5:30

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम अशी जागा आहे जिथे सतत साबण आणि पाणी  वापरले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फक्त डिटर्जंट घेतला तर ते चांगले स्वच्छ होणार नाही.

How to Clean Bathroom Tiles : How to clean bathroom tiles in 10 minutes | How to Clean Bathroom Tiles : बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स,  घर दिसेल चकचकीत 

How to Clean Bathroom Tiles : बाथरूम, किचनच्या टाईल्सचे हट्टी डाग फक्त ५ मिनिटात होतील दूर; 4 हॅक्स,  घर दिसेल चकचकीत 

घरातील सर्वात अस्वच्छ ठिकाण म्हणजे शौचालय आणि स्नानगृह जे सहजासहजी साफ करता येत नाही.  (Cleaning Tips) सतत पाणी आणि साबणामुळे बाथरूमच्या फरशा अतिशय घाण दिसू लागतात. फरशांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांची साफसफाई करणं हे काही वेळा इतकं अवघड काम वाटतं की आपण वायपर चालवून बाथरूमच्या टाइल्स अशाच सोडतो. बाथरूमच्या टाइल्स साफ करणे  सोपे नाही, परंतु जर स्मार्ट वर्क केले तर त्या सहज साफ करता येतात. या लेखात तुम्हाला टाईल्स साफ करण्याच्या टिप्स सांगणार आहोत. (What is the easiest way to clean bathroom tiles)

बाथरूम क्लिनरचा वापर

बाथरूम अशी जागा आहे जिथे सतत साबण आणि पाणी  वापरले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फक्त डिटर्जंट घेतला तर ते चांगले स्वच्छ होणार नाही. पाणी किंवा साबणाचे डाग नेहमी साचून राहतील त्यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हार्पिक किंवा बाथरूम क्लीनर वापरू शकता, परंतु अनेकांना अशा क्लीनरचा वास आवडत नाही, एलर्जी जाणवते म्हणून ते जपून वापरा.

जेवण करताना कांदे, मसाले जळाले तर 3 टिप्स वापरा; फोडणी करपूनही स्वयंपाक होईल चवदार

टाइल्स क्लीनर कसे बनवायचे

2 टीस्पून डिटर्जंट पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 चमचे हार्पिक किंवा बाथरूम क्लीनर हे साहित्य घ्या.  बाथरूम क्लीनर बनवताना ते नक्कीच फेस सोडेल आणि म्हणून ते चमच्याने मिसळा जेणेकरून फेस स्थिर होईल. बाथरूम क्लिनर वापरताना  नेहमी हातमोजे घालावेत कारण ते ऍसिडिक रिअॅक्शन असलेले क्लिनर आहे, त्यामुळे हातांना इजा होऊ शकते.

तुम्हाला फक्त त्यात थोडे पाणी घालायचे आहे आणि ते बाथरूममध्ये पसरवायचे आहे. आता ते वायपरने नाही तर ब्रशने घासून घ्या. किमान 5 मिनिटे घासून घ्या. यापेक्षा कमी वेळ घासल्यास टाइल्समध्ये घाण राहील आणि ते व्यवस्थित साफ केलं जाणार नाही. घासल्याने तुमच्या बाथरूमच्या सर्व टाइलवर क्लिनर पसरेल. नंतर फक्त 5 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर पाणी घालून वायपर चालवा.

पावसाळ्यात ना खराब होणार ना बुरशी लागणार; सोप्या ४ ट्रिक्स वापरा, वर्षभर टिकेल लोणचं

ही पद्धत खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे तुमच्या बाथरूमच्या रंगीबेरंगी टाइल्स देखील चमकतील. सामान्य हार्पिक किंवा सामान्य डिटर्जंटपेक्षा  या द्रावणानं  स्वच्छ करणे चांगले ठरेल. हे केवळ बाथरूमसाठीच नव्हे तर  स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी देखील वापरले जाऊ शकते. पण त्याच्या वासाने अनेकांना त्रास होऊ शकतो. म्हणून साफसफाई करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
 

Web Title: How to Clean Bathroom Tiles : How to clean bathroom tiles in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.