उत्तम आरोग्यासाठी घराचीही (Cleaning Tips) साफ सफाई करणं तितकंच गरजेचं आहे. पण नियमित सफाई करायला जमेलच असे नाही (Bathroom Tiles). घराच्या स्वच्छतेसाठी आपण काही प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण केमिकल प्रॉडक्ट्समुळे घरातील साहित्य स्वच्छ होतीलच असे नाही. जर रासायनिक प्रॉडक्ट्समुळे घराची स्वच्छता करायची नसेल तर, आपण खोबरेल तेलाचाही वापर करू शकता.
खोबरेल तेलाचा वापर आपण सहसा केस आणि त्वचेसाठी करतो. पण याच्या मदतीने आपण घर देखील स्वच्छ करू शकता(How To Clean Bathroom Tiles & Taps).
नवऱ्याची साथ हवी, तरच बायको हिमतीने उभी राहते कारण.. भारती सिंग सांगते लग्नानंतर करिअर करायचं तर..
खोबरेल तेल त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्मांसाठी ओळखले जाते. तर, बेकिंग सोड्याचा वापर स्वयंपाकात वापरण्यासोबत वस्तू स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. पण याच्या वापराने नक्की कोणत्या वस्तू स्वच्छ होतील? घर स्वच्छ करण्यासाठी याचा वापर नेमका कसा करता येईल? पाहा.
क्लिनिंग लिक्विड तयार करण्याची पद्धत
घर स्वच्छ करण्यासाठी आधी अर्धा कप बेकिंग सोडा, अर्धा कप खोबरेल तेल आणि अर्धा कप लिक्विड सोप घ्या. आता तिन्ही एका काचेच्या भांड्यात घेऊन मिक्स करा. आता तुमचे क्लिनिंग लिक्विड तयार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरातील अनेक वस्तू चमकवू शकता.
खोबरेल तेल आणि बेकिंग सोडा घरातील कोणत्या गोष्टी स्वच्छ करू शकतात?
बाथरूम
बाथरूममधील टॉयलेट सीट आणि टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण क्लिनिंग लिक्विडचा वापर करू शकता. यासह शॉवर ग्लास किंवा शॉवर स्क्रीन याच्या मदतीने क्लिन होईल. यासाठी लिक्विड लावून थोडा वेळ ठेवा. नंतर स्क्रबच्या मदतीने स्वच्छ करा.
आज ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्री लहानपणी पाहा कशा दिसायच्या?
टॅप
नळ स्वच्छ करण्यासाठी आपण या लिक्विडचा वापर करू शकता. यासाठी नळावर लिक्विड लावा. नंतर स्क्रबरने घासून टॅप घासून काढा. यामुळे नळ नव्यासारखे चमकेल.
काचेचे वस्तू आणि टेबल
काचेच्या वस्तू, टेबल किंवा खिडक्या स्वच्छ करायच्या असतील तर, आपण या लिक्विडचा वापर करू शकता. यासाठी काचांवर लिक्विड लावा, नंतर टिश्यूने किंवा कापडाने काचा स्वच्छ करा. मिनिटात काचा चमकतील.