Join us  

बाथरूमच्या टाईल्स घासूनही अस्वच्छ-घाणेरड्या दिसतात? बेकिंग सोड्याचा करा ‘हा’ झटपट उपाय; टाईल्स चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 6:14 PM

How to Clean Bathroom Tiles with Baking Soda : साबण किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करूनही बाथरूम अस्वच्छ?

आपण सर्वजण सकाळी उठल्यावर आधी बाथरूमचाच वापर करतो (Cleaning Tips). आंघोळ आटपून आपण पुढील कामं करतो. दररोज घराची सफाईही करतो. पण बाथरूम स्वच्छ करणं राहून जातं. बाथरूम दररोज साफ करायला वेळ मिळेल असं नाही. पण बाथरूमची नीट सफाई करणं गरजेच (Bathroom Clean).

बाथरूमच्या टाईल्सवर बॅक्टेरिया आणि घाण साचते. ज्यामुळे घरात रोगराई पसरते. जर घरात रोगराई पसरू नये असे वाटत असेल तर, आठवड्यातून एकदा बाथरूम साफ करणं गरजेच आहे. बऱ्याचदा स्क्रबरने घासूनही बाथरूमच्या टाईल्स कळकट आणि घाणेरडे दिसतात. यावर उपाय म्हणून आपण एका टॉनिकचा वापर करून पाहू शकता. यामुळे बाथरूम मेहनत न घेता स्वच्छ होईल(How to Clean Bathroom Tiles with Baking Soda).

बाथरूम साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्स

- बाथरूमच्या टाईल्स घाणेरड्या घासूनही अस्वच्छ असतील तर, घरगुती उपाय करून पाहा. यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेकिंग सोडा, २ चमचे डिटर्जंट पावडर आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

- तयार पेस्ट टाईल्सवर लावा. काही वेळानंतर ब्रशने घासून टाईल्स साफ करा. यामुळे अस्वच्छ टाईल्स स्वच्छ होतील.

- अस्वच्छ टाईल्स साफ करण्यासाठी आपण हायड्रोजन पेरोक्साइडचा देखील वापर करू शकता. यामुळे टाईल्सवर जमा झालेली घाण सहज निघेल.

विरळ झालेल्या केसांसाठी वरदान, नवीन केस उगवतील, फक्त खोबरेल तेलात मिसळून १ पदार्थ लावा

- यासाठी एका बाऊलमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड घ्या. त्यात बेकिंग सोडा आणि व्हीनेगर मिक्स करा. तयार पेस्ट टाईल्सला लावा. ब्रशने नंतर घासून साफ करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल