सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा चेहऱ्यासाठी वापर करतो.(Beauty Blender Hygiene) फाउंडेशन, क्रिम्स, मॉइश्चरायझर वापरतो. मेकअप करताना आपण ब्युटी ब्लेंडरचा वापर खूप वेळा करतो.(Clear Skin and Makeup Tools) जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो तेव्हा आपण स्वच्छ करुन पुन्हा याचा वापर करतो. हा ब्यूटी ब्लेंडर व्यवस्थित साफ झाला नाही तर त्यात बॅक्टेरिया आणि घाण जमू शकते. (Beauty Blender Cleaning Solutions)
ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ नसेल तर त्वचेवर मुरुमे, संसर्ग आणि इतर समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी तो योग्य प्रकारे धुवून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.(Beauty Blender Cleaning Tips) अनेकदा आपण वापरण्यापूर्वी पाण्याने किंवा हाताने साफ करतो. परंतु, वापरण्यापूर्वी ते कसे स्वच्छ करायला हवे, तसेच त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी जाणून घेऊया. (How to Clean Beauty Blender)
ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात बुडवून शाम्पू किंवा ब्रश क्लीनरने साफ करा. त्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या त्यात शाम्पू किंवा साबणाचा फेस घाला. यात ब्यूटी ब्लेंडर काही वेळ राहू द्या. ब्यूटी ब्लेंडर व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी चोळून घ्या, ज्यामुळे त्यात अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
जर आपला ब्यूटी ब्लेंडर खूप घाणेरडा झाला असेल तर मायक्रोवेव्ह क्लीनिंग ट्रिक फायदेशीर ठरेल. यासाठी बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात डिशवॉश लिक्विड किंवा शाम्पूचे काही थेंब घाला. त्यात ब्यूटी ब्लेंडर घाला. हा बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ३० ते ४० सेकंद गरम करा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच ब्यूटी ब्लेंडर पूर्णपणे स्वच्छ होतो. मायक्रोवेव्हमधून काढल्यानंतर थंड पाण्याने धुवा आणि पिळून घ्या.
आपला मेकअप किट वॉटरप्रूफ किंवा जास्त महागडा असेल तर ब्युटी ब्लेंडरवरील घाण लवकर निघत नाही. त्यासाठी खोबऱ्याचे तेल किंवा बेबी ऑइलचा वापर करुन साफ करा. त्यासाठी ब्यूटी ब्लेंडर कोमट पाण्यात भिजवा. यानंतर खोबऱ्याचे तेल लावा आणि हलक्या हाताने चोळा. यामुळे साचलेला मेकअप सहज निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर ब्युटी ब्लेंडर शाम्पूने स्वच्छ करा.
ब्यूटी ब्लेंडर सुकवण्याची पद्धत
ब्यूटी ब्लेंडर धुतल्यानंतर ते नेहमी हवेशीर जागेत सुकवा. टिश्यू, रुमाल किंवा टॉवेलवर ठेवून हलका दाब द्या, ज्यामुळे त्याच्या आतील पाणी बाहेर निघेल. हवाबंद डब्यात ओले ठेवल्याने बुरशी लागते. जर आपण दर आठवड्याला ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ केले तर ते अधिक काळ टिकेल. तसेच आपली त्वचा देखील निरोगी राहिल.