Lokmat Sakhi >Social Viral > चहाची गाळणी काळी झालीय? अवघ्या काही मिनिटांत होईल नव्यासारखी, अशी करा स्वच्छ-पाहा व्हिडिओ

चहाची गाळणी काळी झालीय? अवघ्या काही मिनिटांत होईल नव्यासारखी, अशी करा स्वच्छ-पाहा व्हिडिओ

चहा गाळल्यानंतर ती गाळणी पाण्याने स्वच्छ केली जाते. मात्र काही वेळी ती पूर्णपणे नीट स्वच्छ होत नाही. छिद्रांमध्ये अडकलेल्या गोष्टी बाहेर काढताना जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:45 IST2025-01-07T17:35:38+5:302025-01-07T17:45:17+5:30

चहा गाळल्यानंतर ती गाळणी पाण्याने स्वच्छ केली जाते. मात्र काही वेळी ती पूर्णपणे नीट स्वच्छ होत नाही. छिद्रांमध्ये अडकलेल्या गोष्टी बाहेर काढताना जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही.

how to clean black and blocked tea strainer easy tips | चहाची गाळणी काळी झालीय? अवघ्या काही मिनिटांत होईल नव्यासारखी, अशी करा स्वच्छ-पाहा व्हिडिओ

चहाची गाळणी काळी झालीय? अवघ्या काही मिनिटांत होईल नव्यासारखी, अशी करा स्वच्छ-पाहा व्हिडिओ

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहाने होते. काहींना तर दिवसातून बऱ्याच वेळा चहा पिण्याची सवय असते. खूप वेळा चहा गाळल्यामुळे चहाची गाळणी ही हमखास काळी होते. तसेच गाळणीच्या छिद्रांमध्ये काही गोष्टी अडकून राहतात. यामुळे गाळणी खराब दिसते आणि त्याच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या गोष्टी आरोग्यासाठी देखील घातक ठरू शकतात. 

चहा गाळल्यानंतर ती गाळणी पाण्याने स्वच्छ केली जाते. मात्र काही वेळी ती पूर्णपणे नीट स्वच्छ होत नाही. छिद्रांमध्ये अडकलेल्या गोष्टी बाहेर काढताना जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. सोपी पद्धत समजल्यावर तुम्ही अवघ्या काही मिनिटांत गाळणी अगदी नव्यासारखी स्वच्छ करू शकता. त्याबाबत जाणून घेऊया...

'या' गोष्टींची गरज

- डिटर्जंट पावडर
- बेकिंग सोडा
- टूथब्रश

'अशी' करा स्वच्छ

सर्व प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा. आता त्यात एक चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा बेकिंग पावडर घाला. यामध्ये तुम्हाला चहाची गाळणी ठेवायची आहे. पाणी १० मिनिटं उकळू द्यावं. त्यानंतर गाळणी बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होईल.


नव्यासारखी होईल गाळणी 

हे मिश्रण उकळत असताना त्यामध्ये १० मिनिटं ठेवल्यास चहाच्या गाळणीच्या छिद्रांमध्ये अडकून राहिलेल्या गोष्टी बाहेर येतील. त्यानंतर पुन्हा एकदा गाळणी ब्रशच्या मदतीने स्वच्छ करावी लागेल, जेणेकरून संपूर्ण गाळणी पूर्णपणे स्वच्छ होईल. जास्त मेहनत न करता अवघ्या काही मिनिटांत चहाची जुनी गाळणी स्वच्छ तर होईलच आणि पुन्हा नव्यासारखी देखील दिसेल. 

व्हिनेगरची देखील होते मदत

बेकिंग सोडा व्यतिरिक्त, तुम्ही चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर देखील वापरू शकता. चहाची गाळणी त्या व्हिनेगरमध्ये तीन ते चार तास ठेवा. पण जर गाळणी खूपच खराब झाली असेल तर तुम्ही ती रात्रभर व्हिनेगरमध्ये ठेवू शकता. नंतर ते स्क्रबने धुवून पूर्णपणे स्वच्छ करा.
 

Web Title: how to clean black and blocked tea strainer easy tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.