Join us

दोन फरशांमधली फट खूप काळपट दिसते? २ उपाय- घाण फरशा होतील चकाचक स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 20:10 IST

Home Hacks To Clean Dirt Between Two Tiles On Floor: बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं दिसून येतं की दोन फरशांमधला जो गॅप असतो तो खूपच काळपट होऊन जातो. त्यासाठीच बघा हे काही सोपे उपाय..(how to clean blackness between two floor tiles?)

ठळक मुद्देही स्वच्छता करताना अधूनमधून फरशांवर गरम पाणी घाला. यामुळे डाग अधिक पटकन स्वच्छ होतील. 

घर स्वच्छ ठेवण्यासाठी ते नियमितपणे झाडणं, पुसणं गरजेचं असतं. ते काम तर आपण रोज करतोच. घर अगदी दिवसातून दोन वेळा झाडतो. घरही अगदी रोजच्या रोज पुसतो. तरीही बऱ्याचदा असं आढळून येतं की दोन फरशांमधला जो गॅप आहे त्या जागेत खूपच काळपटपणा आलेला आहे. त्यामुळे बाकीच्या फरशा स्वच्छ असूनही त्या अस्वच्छ वाटतात. याचं कारण हेच की आपण दररोजच खूप वेळ देऊन फरशी पुसण्याचं काम नाही करू शकत. त्यामुळे त्या गॅपमध्ये घाण अडकत जाते आणि ती जागा कपड्याने स्वच्छ नाही होऊ शकत (Home Hacks To Clean Dirt Between Two Tiles On Floor). म्हणूनच दोन फरशांमधली जागा स्वच्छ करण्यासाठी या काही ट्रिक्स तुम्ही वापरून पाहू शकता..(how to clean blackness between two floor tiles?)

दोन फरशांमधला गॅप कसा स्वच्छ करायचा?

 

१. टुथब्रश आणि टुथपेस्ट

हा उपाय अगदी सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये टुथपेस्ट घ्या. त्यामध्ये थोडं व्हिनेगर घाला.

world obesity day 2025 : सातच्या आत जेवण, भरपूर प्या पाणी! जाड व्हायचं नसेल तर सेलिब्रिटी करतात ते करा..

दोन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या. ते एका टुथब्रशला लावा आणि त्याच्या मदतीने दोन फरशांमधली जागा स्वच्छ करा. थोडी मेहनत लागेल पण फरशांमधला काळपटपणा पुर्णपणे निघून जाईल.

 

२. व्हिनेगर

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण वापरूनही तुम्ही फरशांमधला गॅप स्वच्छ करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घाला.

खमंग पिठल्याचे झणझणीत प्रकार- शेवग्याच्या शेंगांचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं आणि बरंच काही...

आता त्यामध्ये व्हिनेगर घालून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एखाद्या टुथपेस्टवर घ्या आणि त्याने फरशा स्वच्छ करा. ही स्वच्छता करताना अधूनमधून फरशांवर गरम पाणी घाला. यामुळे डाग अधिक पटकन स्वच्छ होतील. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी