हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे ठेवणीतली पांघरुणं, ब्लँकेट्स, रग असे कपडे कपाटाबाहेर येत आहेत. हे कपडे आपण जवळपास ८ ते १० महिन्यांनी वापरायला काढतो. त्यामुळे ते वापरण्यापुर्वी एकदा स्वच्छ करावेत, असं वाटतं. पण हे कपडे एवढे जड असतात की ते हाताने किंवा मशिननेही धुवायला खूप अवघड जातं. त्यामुळे आता ही एक सोपी ट्रिक पाहा (how to remove odour from blankets?). यामुळे जड ब्लँकेट्स न धुता अगदी स्वच्छ होतील (simple trick to wash blankets in 10 minutes). शिवाय त्यांच्यातला कुबट वास निघून ते नव्यासारखे फ्रेश आणि सुगंधी हाेतील.(how to clean blankets without washing?)
न धुता ब्लँकेट कसे स्वच्छ करावे?
जो ब्लँकेट स्वच्छ करायचा आहे सगळ्यात आधी जमिनीवर किंवा बेडवर पसरवून ठेवा. जमिनीवर पसरवून ठेवणार असाल तर ती जागा आधी स्वच्छ करून घ्या.
साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी
त्यानंतर एका वाटीमध्ये १ टेबलस्पून कोणतीही टाल्कम पावडर आणि २ चमचे बेकिंग सोडा घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि एखाद्या गाळणीच्या मदतीने ब्लँकेटवर पुर्णपणे पसरवून टाका.
५ ते १० मिनिटे झाल्यानंतर हातात एखादा कापडी हातमोजा घाला किंवा एखादा सॉक्स घाला आणि ब्लँकेट हाताने चोळून घ्या.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यात १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात १ टेबलस्पून शाम्पू टाका. पाणी व्यवस्थित हलवून त्याचा फेस करून घ्या. यानंतर त्या भांड्यात एखादा स्वच्छ, सुती कपडा बुडवा आणि तो व्यवस्थित पिळून जास्तीचे पाणी काढून टाका.
रात्री पाय दुखतात- पोटऱ्या ओढल्यासारख्या होतात? भाग्यश्री सांगते १ उपाय, थकवा जाऊन शांत झोप येईल
आता हा कपडा कुकरच्या झाकणाला गुंडाळा आणि ते झाकण ब्लँकेटवरून फिरवून घ्या. यामुळे ब्लँकेटवर असणारी धूळ, घाण आणि त्याचा कुबट वास असं सगळंच निघून जाईल आणि तो एकदम स्वच्छ होईल.