Lokmat Sakhi >Social Viral > चांदी - पितळेची भांडी घासूनही अस्वच्छच? 'या' पाण्यात बुडवा; न घासता भांडी दिसतील चकचकीत

चांदी - पितळेची भांडी घासूनही अस्वच्छच? 'या' पाण्यात बुडवा; न घासता भांडी दिसतील चकचकीत

How To Clean Brass | 2 Easy Brass Cleaning Ideas : चांदी - पितळेची भांडी स्वच्छ करणं म्हणजे अवघड काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2024 09:04 AM2024-11-01T09:04:51+5:302024-11-01T09:05:01+5:30

How To Clean Brass | 2 Easy Brass Cleaning Ideas : चांदी - पितळेची भांडी स्वच्छ करणं म्हणजे अवघड काम

How To Clean Brass | 2 Easy Brass Cleaning Ideas | चांदी - पितळेची भांडी घासूनही अस्वच्छच? 'या' पाण्यात बुडवा; न घासता भांडी दिसतील चकचकीत

चांदी - पितळेची भांडी घासूनही अस्वच्छच? 'या' पाण्यात बुडवा; न घासता भांडी दिसतील चकचकीत

दिवाळीनिमित्त (Diwali 2024) आपण संपूर्ण घर सजवतो. घर सजवल्याने प्रसन्न वाटते (Cleaning Tips). शिवाय घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. दिवाळीत प्रत्येक जण घराची सफाई करतो. नंतर पूजेचे घर स्वच्छ करतो. लक्ष्मी पुजनेला आपण चांदी किंवा पितळेची भांडी स्वच्छ करतो. 

पूजेदरम्यान चांदी आणि पितळेची भांडी आपण वापरतो. पण वापरल्यानंतर आपण पुन्हा स्वच्छ करून ठेवून देतो. पण चांदी आणि पितळेची भांडी लवकर अस्वच्छ होतात. पूजेला वापरण्यापूर्वी चांदी आणि पितळेची भांडी स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर घासूनही चांदी आणि पितळेची भांडी जुनाट आणि अस्वच्छ दिसत असतील तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. मिनिटात भांडी स्वच्छ दिसतील(How To Clean Brass | 2 Easy Brass Cleaning Ideas).

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

पुजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

- पुजेची भांडी घासूनही अस्वच्छ असतील तर, आपण टाटरी सायट्रिक एसिडचा वापर करू शकता. ज्यामध्ये सौम्य ऍसिड असते आणि ते आंबटपणासाठी वापरले जाते. ज्यामुळे भांडीही स्वच्छ होतील.

- यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा टाटरी सायट्रिक एसिड आणि एक चमचा मीठ घाला. सर्व एकत्र मिक्स करा. पाण्यात दोन्ही गोष्टी विरघळल्यानंतर पितळेची भांडी त्यात बुडवून ठेवा. यामुळे भांड्यांवर साचलेली घाण निघून जाईल.

- नंतर लिक्विड डिशवॉशरने पूर्णपणे भांडी स्वच्छ करा. शेवटी पाण्याने भांडी धुवून घ्या, आणि सुक्या कापडाने पुसून घ्या. भांडी जर अशीच ठेवली तर, त्यावर पाण्याचे ठसे उमटतात.

ना डाएट - ना व्यायाम; फक्त दिवभारात 'एवढे' लिटर पाणी प्या; बघा वजनातला फरक झ्टपट

- चांदीची मूर्ती किंवा वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्ट पावडर किंवा टूथपेस्टचा वापर करू शकता. टूथपेस्ट पावडर चांदीच्या भांड्यावर लावा. नंतर ब्रशने घासून भांडी पाण्याने स्वच्छ करा.

Web Title: How To Clean Brass | 2 Easy Brass Cleaning Ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.