Lokmat Sakhi >Social Viral > तांब्या - पितळेची भांडी घासून हात दुखतात? १ सोपा उपाय, न घासता भांडी होतील नवीकोरी चकचकीत...

तांब्या - पितळेची भांडी घासून हात दुखतात? १ सोपा उपाय, न घासता भांडी होतील नवीकोरी चकचकीत...

Try this effective solution to clean copper and brass utensils : तांब्या पितळेची चकचकीत चमकती भांडी कुणाला आवडत नाही पण घासणं मोठं त्रासाचं काम, पण ते कामही होईल सोपं, पाहा हा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 04:08 PM2023-06-21T16:08:56+5:302023-06-21T16:23:16+5:30

Try this effective solution to clean copper and brass utensils : तांब्या पितळेची चकचकीत चमकती भांडी कुणाला आवडत नाही पण घासणं मोठं त्रासाचं काम, पण ते कामही होईल सोपं, पाहा हा सोपा उपाय...

How To Clean Brass And Copper Utensils To Restore Shine With Household Products | तांब्या - पितळेची भांडी घासून हात दुखतात? १ सोपा उपाय, न घासता भांडी होतील नवीकोरी चकचकीत...

तांब्या - पितळेची भांडी घासून हात दुखतात? १ सोपा उपाय, न घासता भांडी होतील नवीकोरी चकचकीत...

घरातील तांब्या - पितळेची भांडी ही आपण घरातील पूजा किंवा इतर काही खास प्रसंग तसेच सणांना वापरतो. एरवी ही भांडी तशीच घरातील माळ्यावर पडून असतात. ही भांडी जास्त प्रमाणात वापरात नसल्याने एका ठराविक काळानंतर काळी पडू लागतात. काही खास प्रसंगाच्या वेळी या भांड्यांचा वापर करून त्याचा वापर झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून एका कोपऱ्यात ठेवतो. अशा भांड्यांवर काळे डागसुद्धा पडू लागतात. या भांड्यांवर पडलेले काळे डाग व काळपट थर कितीही धुतला तरीही जाता जात नाही. वारंवार घासूनही हवी तशी भांड्यांना चमक येत नाही. हे डाग सहसा घासून निघत नाहीत.    

आपल्याकडील प्रत्येक भारतीय सणवाराला ही तांब्या पितळेची भांडी आपल्याला वापरावीच लागतात. यासाठी ही भांडी वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली जातात. परंतु कितीही धुवून किंवा रगडून या भांड्यांवरचा काळा थर काही केल्या जात नाही. तांब्या - पितळेची भांडी चमकवण्यासाठी बाजारांतील विविध साबणांचा किंवा लिक्विडचा वापर केला जातो. परंतु कितीही वेगवेगळ्या प्रकारचे साबण किंवा लिक्विड वापरले तरीही ही भांडी आहे तशीच काळी राहतात. अशावेळी एक सोपा घरगुती उपाय वापरून आपण ही तांब्या - पितळेची भांडी नव्यासारखी लख्ख - चकचकीत करु शकतो. तांब्या - पितळेची भांडी नव्यासारखी चकचकीत करण्यासाठी घरगुती सोपा उपाय नेमका कोणता ते पाहूयात(How To Clean Brass And Copper Utensils To Restore Shine With Household Products).

तांब्या - पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य :- 

१. बेसन - ३ टेबलस्पून
२. मीठ - १ टेबलस्पून 
३. दही - ३ टेबलस्पून
४. हळद - १ टेबलस्पून 
५. लिंबाचा रस -  १ टेबलस्पून

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

तांब्या - पितळेची भांडी चमकवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये ३ टेबलस्पून बेसन घ्यावे. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून मीठ व ३ टेबलस्पून दही घालून घ्यावे. आता त्यात १ टेबलस्पून हळद व १ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. आता हे सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकत्रित करून घ्यावे. 

२. आता हे तयार झालेले मिश्रण हातांच्या मदतीने तांब्या - पितळेच्या भांड्यांवर लावून घ्यावे. हे मिश्रण भांड्यांवर लावून हातांनी थोडे रगडून घ्यावे. आपण हे भांडे घासण्यासाठी ब्रशचा किंवा एखाद्या सुती कापडाचा वापर करून घासून घेऊ शकता.    

३. या भांड्यांवर साचलेला काळा थर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे भांडे रगडून घ्यावे. किमान १० ते १५ मिनिटे या तयार केलेल्या पेस्टने भांडे रगडून घ्यावे. 

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

४. भांडे व्यवस्थित रगडून स्वच्छ केल्यानंतर त्यावरील काळा थर निघाल्यावर एखाद्या सुती कापडाने किंवा टिश्यू पेपरने ही पेस्ट पुसून घ्यावी. 

५. आता हे भांडे पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्यावे. जेणेकरून त्यावरील पेस्ट व काळा थर संपूर्णपणे निघून जाईल. 

६. त्यानंतर हे भांडे एका कोरड्या स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावे किंवा वाळण्यासाठी तसेच ठेवून द्यावे.

Web Title: How To Clean Brass And Copper Utensils To Restore Shine With Household Products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.