Join us  

दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरचे तेलकट, काळे डाग होतील मिनिटभरात स्वच्छ, पाहा दिवे स्वच्छ करण्याची खास पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 1:06 PM

How to clean brass, copper Diya after Diwali : Best Trick To Clean Brass Or Copper Diyas : Best way to clean the diya after diwali : दिव्यांवरील तेलाचा चिकट थर, काळे डाग सहजपणे काढण्यासाठीची ही सोपी युक्ती...

दिवाळीत दिवे हे मुख्य आकर्षण असते. दिवाळीत आपण वेगवेगळ्या आकर्षक पणत्या, दिवे यांची आरास करतो. दिवाळी पणत्या, दिवे यांच्या शिवाय अपूर्णच आहे. दिवाळी सणाला दिव्यांचे विशेष असे स्थान असते. रांगोळी काढून त्याभोवती दिव्यांची आरास करुन आपण हा सण साजरा करतो. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे दिवे लावून आपण घराची सजावट करतो. घर-दार, अंगण संपूर्णपणे दिव्यांनी उजळून निघते. मातीच्या पणत्यांसोबतच आपण पितळ, स्टील, चांदी यांसारख्या इतर धातूंपासून तयार झालेल्या दिव्यांचा देखील वापर करतो(Best Trick To Clean Brass Or Copper Diyas).

दिवाळीत येणारे लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज यांसारख्या विशेष सणांना आपण हे दिवे लावतो. परंतु दिवाळीचे तीन, चार दिवस सतत हे दिवे वापरुन उष्णतेमुळे काळे पडतात. या दिव्यातील तेल - तुपामुळे दिवे चिकट, तेलकट होतात. असे चिकट, तेलकट, काळेकुट्ट झालेले दिवे स्वच्छ करणे फार वेळखाऊ काम असते. यासाठीच दिवाळीत (Best way to clean the diya after diwali) वापरलेल्या दिव्यांवरचे तेलकट, काळे चिकट डाग कसे काढावेत ते पाहूयात. दिव्यांवरील तेलाचा चिकट थर आणि काळे डाग अगदी सहजपणे काढण्यासाठी ते कसे स्वच्छ करावेत याचीच ही एक खास ट्रिक(How to clean brass, copper Diya after Diwali).

दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरील तेलकट, काळे डाग कसे स्वच्छ करावेत ? 

दिवाळीत सतत दिव्यांचा वापर करुन त्यावर तेलाचा चिकट, तेलकट थर साचतो. याचबरोबर उष्णतेने दिवे काळे पडतात. असे दिवे स्वच्छ करण्यासाठी पाणी, लिंबाचा रस, बेकिंग सोडा, डिशवॉश लिक्विड इतके साहित्य आवश्यक आहे. 

फरशीवरील लाल गेरु आणि रांगोळीचे डाग जात नाहीत? ५ ट्रिक्स, फरशी स्वच्छ होऊन दिसेल पुन्हा नव्यासारखी!

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात सगळे दिवे व्यवस्थित भिजतील इतके पाणी घ्यावे. त्यानंतर हे पाणी थोडे कोमट गरम करून घ्यावे. आता या गरम पाण्यात आधी सगळे दिवे ठेवावेत. त्यानंतर यात प्रत्येकी दोन टेबलस्पून लिंबाचा रस, बेकिंग सोडा, डिशवॉश लिक्विड घालावे. 

त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे पाणी थोडे हलवून घ्यावे जेणेकरुन यातील सगळे जिन्नस पाण्यासोबत मिसळतील. 

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...

आता गॅस मध्यम आचेवर ठेवून या भांड्यावर एक झाकण ठेवावे. अशाप्रकारे पाण्याला एक उकळी येऊ द्यावी. 

उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन हे भांडे गॅसवरुन खाली उतरवून घ्यावे. थोडे थंड झाल्यानंतर दिवे या पाण्यातून काढून घ्यावे. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून न घासता देखील दिव्यावरचे तेलकट, चिकट, काळे डाग अगदी सहजपणे काढता येतील.

टॅग्स :दिवाळी 2024सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदिवाळीतील पूजा विधी