Join us  

कढई - पातेली रोज वापरुन काळीकुट्ट झाली ? पाहा, कोळशाचा लहानसा तुकडा करेल जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 11:43 AM

Easiest Way to Clean a Burnt Aluminum Utensils : फारशी मेहेनत न घेता फक्त ५ मिनिटांत जळक्या, काळ्या भांड्यांवरचे चिकट, तेलकट, हट्टी डाग काढा सहज....

स्वयंपाक करण्यासाठी आपण किचनमधील काही मोजकी भांडी रोज वापरतो. या भांड्यांमध्ये टोप, कढई, मोठी पातेली यांचा वापर होतो. जेवण बनवण्यासाठी रोज या भांड्यांचा वापर केल्याने कालांतराने भांडी खराब होतात. काहीकाळाने ही रोजची भांडी अस्वस्च्छ दिसू लागतात. जेवण बनवत असताना कधी -कधी ही भांडी करपतात. कालांतराने त्यांचे पृष्ठभाग काळे (Quick Tips To Clean Burnt Aluminium Utensils At Home) पडू लागतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या पृष्ठभागाशी असलेला तेलकटपण जात नाही. अशी भांडी घासण्यासाठी आपण साबण, स्क्रबर, लिक्विड सोपं यांचा वापर करतो. परंतु काहीवेळा यांचा वापर करुनही भांडी स्वच्छ होत नाहीत(easy ways to clean Aluminum utensils).

किचनमधील टोप, कढई, पातेली यांचे काळे झालेले पृष्ठभाग अस्वच्छ दिसतात. भांड्यांवरील हे जळके काळे डाग (Easy Hacks to Clean a Burnt Vessel) स्वच्छ करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. स्क्रबरने घासून देखील काहीवेळा हे डाग जात नाहीत. अशावेळी आपण अनेक उपाय करून पाहतो. जर आपल्याला फारशी मेहेनत न घेता झटपट भांड्यांच्या तळाशी असलेले काळे डाग काढायचे असतील तर एका सोप्या घरगुती टिप्सचा वापर करू(One solution to clean tough burn stains from utensils).

साहित्य :- 

१. कोळशाचा लहानसा तुकडा - १ तुकडा २. लिंबू - १ 

कितीही घासलं तरीही किचन सिंक तेलकट - चिकटचं राहत ? करा एक सोपा उपाय, सिंक चमकेल नव्यासारखे...  

कृती :- 

१. कोळशाचा लहानसा तुकडा घेऊन त्यावर ३ ते ४ चमचे लिंबाचा रस ओता. २. त्यांनंतर एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्यात हा कोळशाचा तुकडा ठेवून, पिशवीचे तोंड बंद करून लाटणीच्या मदतीने कोळशाचा भुगा करून घ्यावा. ३. आता गाळणीच्या मदतीने हा भुगा गाळून त्याची पावडर वेगळी करून घ्यावी. ४. कोळशाच्या गाळून घेतलेल्या पावडरमध्ये लिंबाचा रस घालून हे मिश्रण मिक्स करुन घ्यावे. 

या मिश्रणाचा वापर कसा करावा ?

कोळशाची पावडर आणि लिंबाचा रस यांचे एकत्रित मिश्रण स्क्रबरच्या मदतीने काळ्या पडलेल्या पृष्ठभागावर लावून घ्यावे. त्यानंतर घासणीच्या मदतीने भांडे घासून घ्यावे. भांडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आता परत एकदा साबण किंवा लिक्विड सोपच्या मदतीने भांडे स्वच्छ धुवून घ्यावे. या सोप्या ट्रिकचा वापर केल्याने भांड्यांचे काळे पडलेले पृष्ठभाग जास्त मेहेनत न घेता झटपट स्वच्छ होतात.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलस्वच्छता टिप्स