Lokmat Sakhi >Social Viral > आतून-बाहेरून कुकर खूपच काळा झाला? ३ सोपे उपाय, कुकर चमकेल नव्यासारखा-होईल स्वच्छ

आतून-बाहेरून कुकर खूपच काळा झाला? ३ सोपे उपाय, कुकर चमकेल नव्यासारखा-होईल स्वच्छ

How To Clean Burnt Black Stains On Cooker: काळं पडलेलं कुकर कसं स्वच्छ, चकाचक करायचं असा प्रश्न पडला असेल तर हा उपाय करून पाहा. (how to get rid of blackishness of cooker)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 05:07 PM2024-07-22T17:07:26+5:302024-07-22T17:16:51+5:30

How To Clean Burnt Black Stains On Cooker: काळं पडलेलं कुकर कसं स्वच्छ, चकाचक करायचं असा प्रश्न पडला असेल तर हा उपाय करून पाहा. (how to get rid of blackishness of cooker)

how to clean burnt black stains on cooker, best method for cleaning blackness of cooker, how to get rid of blackishness of cooker, how to make cooker shine | आतून-बाहेरून कुकर खूपच काळा झाला? ३ सोपे उपाय, कुकर चमकेल नव्यासारखा-होईल स्वच्छ

आतून-बाहेरून कुकर खूपच काळा झाला? ३ सोपे उपाय, कुकर चमकेल नव्यासारखा-होईल स्वच्छ

Highlightsतुमच्या कुकरची गतदेखील अशीच झाली असेल तर काळवंडलेलं कुकर पुन्हा नव्यासारखं चकाचक करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा.

कुकर ही आपल्या रोजच्या वापरातली वस्तू. कधी कधी तर दिवसातून अगदी २- ३ वेळा कुकर लावावा लागतो. त्याचा वापर जास्त असल्याने ते खराब होतंच. पण त्यात जर ते स्वच्छ करण्यात आपण कमी पडत असू तर कुकर आतून आणि बाहेरून काळपट होऊन जातं. मग ते ॲल्युमिनियमचं असो किंवा मग स्टीलचं असो. ते काळं पडत गेलं की त्याच्यावरची चमकही कमी होऊन जाते आणि ते अगदीच जुनाट, टाकाऊ दिसू लागतं (how to get rid of blackishness of cooker). तुमच्या कुकरची गतदेखील अशीच झाली असेल तर काळवंडलेलं कुकर पुन्हा नव्यासारखं चकाचक करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा. (how to clean burnt black stains on cooker)
 
काळवंडलेलं कुकर स्वच्छ करण्यासाठी उपाय 

 

१. लिंबू

बऱ्याच घरांमध्ये असं असतं की कुकर बाहेरून तर स्वच्छ, चकाचक असतो. पण आतल्या बाजुने मात्र तो काळवंडून गेलेला असतो. असं होऊ नये म्हणून लिंबू अतिशय उपयुक्त ठरतं.

'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

हा उपाय करण्यासाठी तुम्ही जेव्हा कुकरमध्ये डाळ- भात लावाल, तेव्हा आधी तळाशी पाणी टाकल्यानंतर त्या पाण्यात लिंबाच्या १- २ फोडी टाकून ठेवा. यामुळे कुकर आतल्या बाजुने अजिबात काळं होणार नाही.

 

२. कॉर्नफ्लॉवर

हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात ३ चमचे कॉर्नफ्लॉवर आणि १ चमचा बेकिंग सोडा घ्या. यामध्ये एखाद्या लिंबाचा रस पिळा. त्यानंतर त्यात थोडं डिशवॉश लिक्विड घाला आणि त्याची पेस्ट तयार करा.

फ्लॉवरपॉटमधली फुलं १- २ दिवसांत सुकतात? 'हा' खास पदार्थ टाका, फुलं राहतील फ्रेश- सुगंधी

आता ही पेस्ट काळवंडलेल्या कुकरला १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर कुकरवर थोडं पाणी टाकून ते ओलसर करा आणि त्यानंतर घासणीने घासून स्वच्छ करा. कुकर छान चकाचक होईल.

 

३. चिंच आणि मीठ 

काळवंडलेलं कुकर स्वच्छ करण्यासाठी हा उपायही खूप सोपा आहे.

सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर दिसणारा सोनेरी ग्लो तुमच्या चेहऱ्यावरही येईल फक्त १० रुपयांत- बघा उपाय... .

हा उपाय करण्यासाठी एका वाटीत चिंचेचा कोळ घ्या आणि त्यात मीठ टाका. आता हे मिश्रण कुकरला लावा आणि घासणीने घासून स्वच्छ करा. काळवंडलेलं कुकर नव्यासारखं चमकेल.

 

Web Title: how to clean burnt black stains on cooker, best method for cleaning blackness of cooker, how to get rid of blackishness of cooker, how to make cooker shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.