Join us  

जळून काळपट पडलेली कढई २ मिनिटात होईल स्वच्छ; तासंतास घासण्याचे कष्टच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:57 PM

How to Clean Burnt Kadai Quickly : एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा, त्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर घाला आणि पॅन पूर्णपणे बुडवा.

रोजची काम करताना घाईघाईत बरीच काम वाढतात. कधी दूध उतू जातं तर कधी फोडणी घालताना जरा दुर्लक्ष झालं की तेल जळून कढयाही जळतात. एकदा कढई जळली की तासनतास स्वच्छ करूनही लवकर साफ होत नाही. कढई लवकर स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (Cleaning Tips) बेकींग सोडा, लिंबू, साखरेचा वापर करून तुम्ही कढई स्वच्छ करू शकता. (Amazing tips to clean aluminium kadai kadhai saaf karne ke tips)

१) सगळयात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात ३ ग्लास पाणी घाला. पाण्यात २ चमचे कोणतंही डिटेर्जंट घाला आणि एक चमचा मीठ, एक चमचा लिंबांचा रस घाला. आता हे पाणी ५ मिनिट उकळत ठेवा. फ्लेम हाय केल्यानंतर पाणी उकळून घ्या.  

२) हे पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. जेणेकरून पूर्ण भाग पाण्यात बुडेल. १० ते १५ मिनिटांपर्यंत बुडवून घ्या. त्यानंतर कढईचा काळपटपणा सहज निघून  जाईल. अजून कुठे काळेपणा शिल्लक असेल तर तो भाग गॅसवर गरम करून त्याच पद्धतीने स्वच्छ करा.

३) एका मोठ्या भांड्यात पाणी उकळा, आता उकळलेल्या पाण्यात दोन चमचे बेकिंग पावडर टाका आणि थोडे मीठ घाला आणि ढवळून त्यात कढई बुडवा. काही वेळाने जुन्या टूथब्रशच्या मदतीने पॅनला हलकेच घासत राहा, त्याचा काळेपणा आणि जळलेला भाग साफ व्हायला सुरुवात होईल.

४) एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा, त्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर घाला आणि पॅन पूर्णपणे बुडवा. किमान दहा मिनिटे असेच ठेवा आणि नंतर स्क्रबने स्वच्छ घासून धुवून घ्या.  

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स