Lokmat Sakhi >Social Viral > काळाकुट्ट झालेला कुकर स्वच्छ चकचकीत करण्याची १ सोपी ट्रिक; कुकर चमकेल नव्यासारखा...

काळाकुट्ट झालेला कुकर स्वच्छ चकचकीत करण्याची १ सोपी ट्रिक; कुकर चमकेल नव्यासारखा...

How To Clean Burnt Steel Cooker Easy Hack : हा जळालेला भाग स्वच्छ करण्यासाठी आणि कुकर किंवा कढई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 11:59 AM2023-08-02T11:59:58+5:302023-08-02T12:01:51+5:30

How To Clean Burnt Steel Cooker Easy Hack : हा जळालेला भाग स्वच्छ करण्यासाठी आणि कुकर किंवा कढई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी सोपी ट्रिक

How To Clean Burnt Steel Cooker Easy Hack : 1 Easy Trick to Shine a Blackened Cooker; Cooker will shine like new... | काळाकुट्ट झालेला कुकर स्वच्छ चकचकीत करण्याची १ सोपी ट्रिक; कुकर चमकेल नव्यासारखा...

काळाकुट्ट झालेला कुकर स्वच्छ चकचकीत करण्याची १ सोपी ट्रिक; कुकर चमकेल नव्यासारखा...

कुकर ही आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट. भात वरणापासून ते अगदी एखादी भाजी किंवा पुलाव, खिचडी अशा सगळ्या गोष्टी शिजवण्यासाठी आपण सर्रास कुकरचा वापर करतो. झटपट शिट्ट्या होऊन स्वयंपाक कमी वेळात परफेक्ट होण्यामागे या कुकरची खूप मोठी भूमिका असते. अमुक पदार्थाला तमुक शिट्ट्या घ्यायच्या, इथपासून ते अगदी राहीलेलं अन्न गरम करण्यासाठीही आपण कुकरचा उपयोग करतो. त्यामुळे आपल्याला कुकर लागला नाही असा क्वचितच एखादा दिवस असेल. काहीवेळा कुकरमध्ये खाली घातलेले पाणी संपते आणि कुकर जळतो. अशावेळी त्यातील अन्न तर जळतेच पण आतून हा कुकर पूर्णपणे काळा होऊन जातो. हा कुकर स्टीलचा किंवा अॅल्युमिनिअमचा असेल तर तो आतून इतका काळा होतो की त्याचा मूळ रंगच आपल्याला आठवेनासा होतो (How To Clean Burnt Steel Cooker Easy Hack). 

(Image : Google)
(Image : Google)

आता या जळालेल्या कुकरमध्ये अन्न करायचे तर त्याला जळका वास लागतो आणि तो आपण कितीही घासायला प्रयत्न केला तरी आपल्या हाताने काही तो निघत नाही. मग तो साबणाच्या पाण्यात भिजत घालणे किंवा आणखी काही प्रयत्न करुन त्याचा काळेपणा किंवा जळालेला राप काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तो आपल्याला निघतोच असे नाही आणि मग आपले स्वयंपाकाचे काम खोळंबते. अशावेळी घरात आणखी एखादा कुकर असेल तर ठिक नाहीतर मग आपल्याला कुकरशिवाय स्वयंपाक कसा करायचा हे अजिबातच सुचत नाही. कुकरच नाही तर अनेकदा अशाप्रकारे आपली कढई पण जळू शकते. हा जळालेला भाग स्वच्छ करण्यासाठी आणि कुकर किंवा कढई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

१. कुकरमध्ये पूर्ण पाणी भरुन तो गॅसवर उकळण्यासाठी ठेवावा. 

२. यामध्ये कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर घालावी आणि मंद आचेवर १५ ते २० मिनीटे हे पाणी चांगले उकळावे. 

३. गरज पडल्यास यामध्ये व्हिनेगर घातले तरी कुकरचा जळकेपणा आणि काळपटपणा अगदी सहज निघून येण्यास मदत होते. 


४. आता हे पाणी फेकून द्यावे किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून ठेवावे. 

५. यानंतर तारेच्या घासणीने खाली राहीलेला थोडा भाग घासून स्वच्छ करुन घ्यावा. 

६. याच पद्धतीने आपण स्टीलची जळालेली कोणतीही भांडी साफ करु शकतो. 

Web Title: How To Clean Burnt Steel Cooker Easy Hack : 1 Easy Trick to Shine a Blackened Cooker; Cooker will shine like new...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.