Lokmat Sakhi >Social Viral > जळकट, काळपट भांडी स्वच्छ करण्याचे 6 सोपे उपाय, भांडी होतील स्वच्छ- चकाचक 

जळकट, काळपट भांडी स्वच्छ करण्याचे 6 सोपे उपाय, भांडी होतील स्वच्छ- चकाचक 

Remedies to Clean Burnt Utensils: गडबडीत स्वयंपाक करताना बऱ्याचदा भांडी जळून जातात. अशी जळकट- कळकट भांडी स्वच्छ करणं (cleaning tips) हे महाकठीण काम. त्यासाठीच तर करून बघा हे सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 05:51 PM2022-09-06T17:51:12+5:302022-09-06T17:51:55+5:30

Remedies to Clean Burnt Utensils: गडबडीत स्वयंपाक करताना बऱ्याचदा भांडी जळून जातात. अशी जळकट- कळकट भांडी स्वच्छ करणं (cleaning tips) हे महाकठीण काम. त्यासाठीच तर करून बघा हे सोपे उपाय.

How to clean burnt utensils? 6 Remedies to clean burnt stains on utensils | जळकट, काळपट भांडी स्वच्छ करण्याचे 6 सोपे उपाय, भांडी होतील स्वच्छ- चकाचक 

जळकट, काळपट भांडी स्वच्छ करण्याचे 6 सोपे उपाय, भांडी होतील स्वच्छ- चकाचक 

Highlightsस्टीलची भांडी जळाली असतील किंवा त्याच्यावर डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा रस घ्या.

हा अनुभव स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेलाच असतो. स्वयंपाक करताना एकावेळी अनेक गोष्टी महिलांना सांभाळाव्या लागतात. एकावेळी भाजी, वरण यांना फोडणी घालणं, त्याचवेळी पोळ्या करणं, घरात कोण काय विचारतंय ते बघणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं अशी सगळी काम महिलांना एकावेळी करावी लागतात. त्यात बऱ्याचदा गॅस गरजेपेक्षा मोठा होतो किंवा मग थोडं दुर्लक्ष झाल्याने कढईतला पदार्थ जळून (How to clean burnt utensils) तळाला लागतो. अशी जळकट भांडी स्वच्छ करणं (cleaning tips) हे मोठं कठीण काम असतं. 

 

जळकट भांडी स्वच्छ करण्यासाठीचे उपाय
How to clean burnt utensils?

१. स्टीलची भांडी जळाली असतील किंवा त्याच्यावर डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा रस घ्या. त्यात तुरटीची पावडर आणि थोडं लिक्विड डिश वॉश टाका. हे मिश्रण डागांवर चोळा. ४ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर तारेच्या घासणीने घासून भांडे स्वच्छ करा.

२. तांब्यावर पडलेले काळपट डाग स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ असा उपाय करावा. लिंबू कापून ते मिठात बुडवावे आणि ते मीठ भांड्यावर चोळावे.

 

३. ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी कपडे धुण्याची पावडर आणि मीठ असे मिश्रण वापरावे. या दोन्ही गोष्टी सम प्रमाणात घेऊन भांड्यावरच्या डागावर चोळा आणि तारेच्या घासणीने घासून भांडी स्वच्छ करा.

४. बेकींग सोडा आणि कपडे धुण्याची पावडर या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याने डाग पडलेली भांडी घासा. कमी मेहनतीत भांडी चकाचक होतील.

 

५. भांडी खूपच जळाली असतील, तर दोन- तीन तासांसाठी जळकट भांड्यांमध्ये व्हिनेगर टाकून ठेवा. त्यानंतर बेकींग सोडा टाकून ही भांडी स्वच्छ करा.

६. जळालेलं भांडं स्वच्छ करण्यासाठी भांड्यात पाणी आणि बेकींग सोडा टाका आणि ते पाणी उकळून घ्या. एखादा तास तसंच ठेवा आणि त्यानंतर भांडे घासून घ्या. 

 

Web Title: How to clean burnt utensils? 6 Remedies to clean burnt stains on utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.