Join us  

५ मिनिटांत स्वच्छ होतील जळालेली काळी भांडी, सोपा उपाय-नवीकोरी चकाकतील पातेली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 9:12 AM

How to Clean Burnt Utensils : काळ्या पडलेल्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात.

अनेकदा स्वंयपाक करत असताना लक्ष नसेल तर दूध उतू  जातं किंवा चहाचं भाडं काळं पडतं. अशावेळी भांडी स्वच्छ करणं खूप कठीण वाटतं. भांडी स्वच्छ करण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. तर कधी पातेल्या खराब होतात. (Jalaleli Bhandi Kashi Swatch Kravi) घिसणीने व्यवस्थित घासूनही भांडी कळकट राहतात. काळ्या पडलेल्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Ways to clean tough burn stains from utensils)

गरम पाणी

जळालेली पातेली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. यासाठी गरम पाणी भरून ठेवल्याने डाग लगेच निघण्यास मदत होते. चहाची जळालेली पातेली स्वच्छ करणं यामुळे अधिक सोपं होऊ शकतं. सगळ्यात आधी गरम पाणी पातेल्यात भरून घ्या. १५ ते २० मिनिटं भिजवल्यानंतर प्लास्टीकच्या स्क्रबरने स्वच्छ करा.

चणे आणि गूळ खाल्ल्यानं वजन वाढतं का? चणे कोणी खावेत-किती प्रमाणात खावेत, समजून घ्या

तुरटीचा तुकडा

तुरटीच्या तुकड्याने भांड्यांवरची काळा थर दूर होतो. त्यासाठी पॅन थोडा ओला करा त्यानंतर तुरटीच्या मदतीने रगडून स्वच्छ करा. त्यात मीठ घालून ५ मिनिटं असंच ठेवा.  जर तुम्ही चुकून मीठ जास्त घातलं तरी चालेल. थोड्यावेळासाठी असंच ठेवल्यानंतर पॅन स्वच्छ करा. जवळपास  २ वेळा हा उपाय केल्याने भांडं स्वच्छ होईल.

लिंबू 

घराची साफसफाई करण्याासाठी लिंबू फायदेशीर ठरतो. फरशी क्लिन करण्यापासून सामान सॅनिटाईज करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. घर फ्रेश ठेवण्यासाठी लिंबू हा नैसर्गिक पदार्थ आहे.  हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ताज्या लिंबाची गरज नाही. लिंबाचे साल तुम्ही जळालेल्या भांड्यात ठेवून त्यात गरम पाणी घालाय ७ ते ८ मिनिटं उकळल्यानंतर हे पाणी वेगळ्या पॅनमध्ये ठेवा. आता लिंबाची सालं तव्यावर  किंवा जळालेल्या पातेलीवर रगडून स्वच्छ करा.  त्यानंतर पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.

ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठाने भांडी लगेच स्वच्छ होतात. हे दोन पदार्थ प्रत्येकाच्याच घरात असतात. मीठ एखाद्या स्क्रबरप्रमाणे काम करते. लिंबाने भांड्याचा काळेपणा दूर होतो आणि चिटकपणा दूर होतो.  सगळ्यात आधी पॅनवर जमा झालेला चहाचा थर काढून टाकण्यासाठी सुरीचा किंवा घिसणीचा वापर करा. नंतर एका वाटीत मीठ, पाणी आणि लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणात तुरटी घालून जळालेला भाग स्वच्छ करा. नंतर पॅन स्वच्छ करून घ्या.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन