Join us

२ रूपयांची तुरटी वापरून चमकवा काळी झालेली कढई; जुनी कढई दिसेल नवीकोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 23:39 IST

How To Clean Cast Iron Pain : लोखंडाची कढई साफ करणं  खूपच मेहनतीचे काम असते. आजही गावच्या ठिकाणी लोक कढईत साफ करण्यासाठी वीट किंवा राखेचा वापर करतात.

लोखंडाच्या कढईत जेवण शिजवल्यानं ते अधिक स्वादीष्ट आणि पौष्टीक बनतं. सगळ्यात मोठा प्रोब्लेम असा होतो की काळी झालेली कढई लवकर स्वच्छ होत नाही. या कढईत शिजवलं जाणारं अन्नही लवकर जळू लागतं आणि बरेच दिवस कढई स्वच्छ न केल्यास कढईमध्ये काळा थर जमा होऊ लागतो. (How To Clean Cast Iron Pain)

लोखंडाची कढई साफ करणं  खूपच मेहनतीचे काम असते. आजही गावच्या ठिकाणी लोक कढईत साफ करण्यासाठी वीट किंवा राखेचा वापर करतात. इतकी मेहनत करण्यापेक्षा अगदी सोपा उपाय करून तुम्ही फक्त १० रूपयात कढई स्वच्छ करू शकता. (How To Clean Quickly Using Alum)

कढई स्वच्छ करण्याची पहिली पायरी

सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवून गरम करून घ्या. नंतर त्यावर तुरटी रगडा. जेव्हा तुम्ही लोखंडाच्या कढईवर तुरटी रगडाल तेव्हा काळेपणा सुटेल. रगडल्यानंतर यावर पाणी घाला. त्यानंतर तुरटीचे तुकडे एका चमच्यात घेऊन त्यात मीठ मिसळून ५ मिनिटांसाठी तसंच सोडून द्या.

लोखंडाची काळी कढई कशी चमकवाल?

थोड्या वेळानंतर कढईमध्ये हे मिश्रण घालून कोणत्याही वाटग्यात काढून घ्या. नंतर कढईत डिश बार किंवा लिक्विड घालून थोडं रगडून साफ करून घ्या. या दरम्यान तुरटी पाण्यात वितळवण्यासाठी याचा वापर करा. तुरटीच्या मदतीनं कढई नव्यासारखी चमकेल. 

लोखंडाची काळी कढई स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाची पावडर वापरा. व्हाईट व्हिनेगर कढईत घालून तुम्ही मळ आणि घाण क्लिन करू शकता. कढईला गंज लागण्यापासून वाचवण्यासाठी मोहोरीचं तेल उत्तम आहे, व्हाईट व्हिनेगरमुळे कढईचा मळ काढून टाकण्यास मदत होते. मोहोरीच्या तेलाचाही तुम्ही वापर करू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरल