Lokmat Sakhi >Social Viral > शिडीवर न चढता २ मिनिटांत स्वच्छ करा धूळ लागलेला पंखा; ५ ट्रिक्स-पंखा चमकेल, चकचकीत दिसेल

शिडीवर न चढता २ मिनिटांत स्वच्छ करा धूळ लागलेला पंखा; ५ ट्रिक्स-पंखा चमकेल, चकचकीत दिसेल

How To Clean Ceiling Fan (Diwali Cleaning Tips) : स्टूलवर चढून फॅन स्वच्छ करणं अनेकांना कठीण वाटतं. टेबल किंवा खुर्चीचा आधार न घेता तुम्ही पंखा स्वच्छ करून शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:47 PM2024-10-21T20:47:40+5:302024-10-21T20:49:29+5:30

How To Clean Ceiling Fan (Diwali Cleaning Tips) : स्टूलवर चढून फॅन स्वच्छ करणं अनेकांना कठीण वाटतं. टेबल किंवा खुर्चीचा आधार न घेता तुम्ही पंखा स्वच्छ करून शकता.

How To Clean Ceiling Fan : Ceiling Fan Cleaning Tips How To Clean Ceiling Fan | शिडीवर न चढता २ मिनिटांत स्वच्छ करा धूळ लागलेला पंखा; ५ ट्रिक्स-पंखा चमकेल, चकचकीत दिसेल

शिडीवर न चढता २ मिनिटांत स्वच्छ करा धूळ लागलेला पंखा; ५ ट्रिक्स-पंखा चमकेल, चकचकीत दिसेल

दिवाळीचा (Diwali 2024)  सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. साफ सफाईची लगबग सर्वांच्याच घरात सुरू आहे. घरात भंगार आणि  निरूपयोगी पडलेलं सामान लोक कचरावाल्यांना देतात. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातील सामानाचीही साफ सफाई करतात. पण सिलिंग फॅन स्वच्छ करायचा राहून जातो. (Ceiling Fan Cleaning) स्टूलवर चढून फॅन स्वच्छ करणं अनेकांना कठीण वाटतं. टेबल किंवा खुर्चीचा आधार न घेता तुम्ही पंखा स्वच्छ करून शकता. पंखा स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How To Clean Ceiling Fan)

1) पंखा जर १० ते  १५ दिवस स्वच्छ केला नाही तर पंख्याच्या ब्लेड्सवर धूळ, मातीचा मोठा थर बसू लागतो. ज्यामुळे पंखा स्लो होतो. तुम्ही पंखा स्टूलवर न चढता स्वच्छ करू शकता. मार्केटमध्ये आजकाल  क्लिनिंग डस्टर मिळत आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही पंख्याची साफसफाई करून शकता तुम्ही खाली उभं राहूनही करू शकता. 

2) डस्टरने पंखा साफ करण्यासाठी तुम्हाला ब्लेड साफ करावे लागतील. नंतर एका बादलीत पाणी घ्या. त्यात मीठ, व्हाईट व्हिनेगर, डिटर्जेंट, २ चमचे नारळाचं तेल घालून मिक्स करा.  या मिश्रणात डस्टर बूडवून पिळून घ्या नंतर पंखा स्वच्छ करा. या उपायानं पंखा चमकू लागेल.

ओटी पोट-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हे २ पदार्थ घालून प्या, सुडौल दिसाल

3) जर तुमच्या घरी वॅक्यूम क्लिनर असेल तर त्याच्या मदतीनं तुम्ही पंख्याची साफसफाई करू शकता. वॅक्यूम क्लिनर पकडून फॅनच्या ब्लेडवर फिरवा.  पंखा स्विच ऑफ असेल याची काळजी घ्या. सर्व धूळ, माती वॅक्यूम क्लिनर शोषून घेईल.

4)  डस्टिंग ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. ज्यामुळे तुम्ही घरातील सर्व पंखे चमकवू शकता. तुम्हाला शिड्या चढण्याची गरज लागणार नाही. हा डस्टिंग ब्रश तुम्ही आठवड्यातून एकदा सिलिंग फॅनवर चालवू सकता ज्यामुळे घाण लागणार नाही आणि पंखा पूर्ण वेगानं चालेल.

दिवाळीत खरेदी करा १ ग्रॅम सोन्याची नाजूक अंगठी; १० आकर्षक डिजाइन्स

5) जर तुमच्याघरी हँगर असेल तर तुम्ही याचे क्लिनिंग डस्टर बनवू शकता. यासाठी तुम्ही हँगरच्या दोन्ही बाजूंनी स्पंज लावा. नंतर हँगर पकडण्यासाठी त्यात रॉड किंवा लाकडाच्या काठीला कोणतीही मोठी, लांब दोरी बांधा. तुम्ही फरशीवर उभं राहून पंख्याची साफसफाई करू शकता. स्पॉन्ज डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवून पिळून नंतर पंखा पुसून घ्या.

Web Title: How To Clean Ceiling Fan : Ceiling Fan Cleaning Tips How To Clean Ceiling Fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.