Join us  

कळकट-चिकट सिलिंग फॅन होतील स्वच्छ, वापरा फक्त २ रुपयांची एक गोष्ट-फॅन चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2024 1:39 PM

How to Clean Ceiling Fans Without Making a Mess : अवघ्या ५ मिनिटात स्मार्ट पद्धतीने स्वच्छ करा सिलिंग फॅन, वेळखाऊ काम होईल चटकन..

उन्हाळा सुरु झाल्यानंतर फॅनचा वापर अधिक प्रमाणात होतो. उन्हाच्या तडाख्यापासून शरीराचे सरंक्षण करण्यासाठी आपण फॅन दिवसरात्र चालूच ठेवतो. फॅन अधिक वेळ चालू ठेवल्याने वीजबिल तर जास्त येतेच, शिवाय फॅनवर धूळ आणि घाण जमा होते. धूळ जमा झाल्याने ते हवेत पसरतात (Ceiling Fans). धुळीमुळे आपणही आजारी पडतो, हे वेगळेच. काहींना सिलिंग फॅन साफ करणे खूप कठीण वाटते.

बरेच लोकं महिना-महिनाभर सिलिंग फॅन साफ करत नाही (Ceiling Fan Cleaning Tips). काही लोकांची उंची कमी असल्याकारणाने सिलिंग फॅन साफ करण्यासाठी शिडी किंवा इतर उंच वस्तूचा वापर करतात. जर आपल्याला पंख्याच्या पातीला हात न लावता स्वच्छ करायचं असेल तर, ही ट्रिक वापरून पाहा (Cleaning Tips). या ट्रिकच्या मदतीने काही मिनिटात सिलिंग फॅन स्वच्छ होईल(How to Clean Ceiling Fans Without Making a Mess).

स्मार्ट पद्धतीने स्वच्छ करा सिलिंग फॅन

स्टेप १ - सर्वप्रथम, सिलिंग फॅन बंद करून ठेवा. काही वेळ सिलिंग फॅनला हात लावणं टाळा. कारण अधिक वेळ चालू राहिल्या कारणाने सिलिंग फॅन गरम होते. ज्यामुळे साफ करताना चटका देखील बसू शकते.

स्टेप २ - आता आपल्या घरातील जुने उशीचे कव्हर घ्या. स्टूल किंवा शिडीवर चढून पंख्याच्या ब्लेडच्या आत उशीचे कव्हर लावून झाका. अशा प्रकारे, ब्लेडमधील सर्व घाण उशीच्या कव्हरच्या आत येईल. तसेच, पंखा वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूनी साफ होईल.

स्टेप ३ - पंखा साफ करताना बऱ्याचदा धुळीचे कण डोळे आणि केसांवर पडतात. त्यामुळे पिलो कव्हरच्या मदतीने फॅनच्या पाती स्वच्छ पुसून घ्या. आपण यानंतर दुसऱ्या ओल्या कापडाने फॅनच्या पाती पुसून काढू शकता.

आठवड्यातून केसांना किती वेळा तेल लावावे? 'या' पद्धतीने तेल लावल्यास मिळेल पोषण; केस होतील दाट इतके की..

स्टेप ४ - जर फॅनच्या पातीवर धुळीमुळे काळे डाग पडले असेल तर, दोन रुपयाच्या शाम्पूने स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या, त्यात दोन रुपयाचा शाम्पू घालून मिक्स करा, व या पाण्यात कापड बुडवून पंख्याच्या ब्लेड पुसून काढा. यामुळे पंखा चकाचक चमकेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

महाशिवरात्री स्पेशल: विकतची कशाला? घरीच तयार करा केसरीया थंडाई; बमबम भोले म्हणत घ्या थंडाईचा आस्वाद

सिलिंग फॅन स्वच्छ करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. सिलिंग फॅन स्वच्छ करण्यापूर्वी लाईट बंद करा. जेणेकरून विजेचा झटका बसण्याचा धोका कमी होईल. यानंतर आपले डोके आणि चेहरा एका कापडाने झाकून घ्या. त्यानंतरच सिलिंग फॅन स्वच्छ करायला घ्या. शिवाय सिलिंग फॅन स्वच्छ केल्यानंतर लगेच चालू करू नये. काही वेळानंतर चालू करावे.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया