कोणत्याही घरासाठी तवा, कुकर हे सर्व लागणारं साहित्य असते. या वस्तूशिवाय किचन अपूर्ण वाटते. चपाती, पराठे, चिला किंवा थेपला बनवण्यासाठी तव्याचा वापर केला जातो. रोज साफ-सफाई केल्यानंतरही त्यात तेल चिकटलेले असते. (How To Clean Cooking Pan In 5 Minutes) चिकट जळालेला तवा साफ करणं अजिबात सोपं नसतं. व्यवस्थित साफ-सफाई न केल्यास तवा काळपट, अस्वच्छ, घाणेरडा दिसू लागतो. काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय तवा चमकवू शकता. (Home Hacks & Tips)
तवा साफ करण्यासाठी लागणारं साहित्य (How To Clean Cooking Pan)
काळा झालेला तवा साफ करण्यासाठी तुम्हाला खूप सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी लिंबू, मीठ आणि १ रूपयांचा शॅम्पूचा पाऊच घ्या. हे पदार्थ तव्याला लावून तुम्ही कठीणातील कठीण डागसुद्धा काढू शकता. चिकट तवा साफ करण्यासाठी सगळ्यात आधी तवा गॅसवर ठेवा त्यानंतर हलक्या आचेवर गॅस ऑन करून ठेवा.
त्यानंतर तव्यावर एक पॅकेट शॅम्पूचे घाला. त्यात एक चमचा मीठ, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर लिंबू पिळून तव्यावर घासा. त्यातील तेल आणि घाण सहज साफ होण्यास मदत होईल. नंतर गॅस बंद करून तवा व्यवस्थित स्वच्छ करा. स्क्रबमध्ये डिश वॉश जेल लावून थोडावेळ रगडून धुवून टाका.
प्रोटीन हवंय बदाम परवडत नाही? 'या' ५ डाळी खा, साइड इफेक्ट्सही होणार नाहीत
जर घरातला तवा वारंवार धुवून काळा झाला असेल तर एका बाऊलमध्ये शॅम्पूबरोबर डिटर्जेंट, लिंबू, मीठ आणि थोडी रेतीचे बारीक तुकडे मिसळा. हे मिश्रण स्क्रबरच्या मदतीने तव्यावर व्यवस्थित लावा. नंतर सर्व पदार्थ लावल्यानंतर हळूहळू तवा स्टिलप्रमाणे चमकलेला दिसून येईल.
कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी
काळा तवा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी हलक्या आचेवर गरम करा. त्यावर लिंबाचा रस घालून स्क्रब करा. गॅस बंद केल्यानंतर तव्यावर व्हिनेगर घाला ज्यामुळे तवा सहज स्वच्छ होईल. नॉन स्टिक पॅन वापरण्याआधी त्या बॉक्सवरील इंस्ट्रक्शन्स वाचायला विसरू नका.