Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीच्या उरलेल्या पणत्या वापरून करा तांब्या पितळेची भांडी चकाचक, १ मिनिटाचे सोपे काम

दिवाळीच्या उरलेल्या पणत्या वापरून करा तांब्या पितळेची भांडी चकाचक, १ मिनिटाचे सोपे काम

how to clean copper vessels at home | Simple Trick to Clean Copper Utensils तांब्या पितळेची भांडी स्वच्छ चकाचक ठेवणे काही सोपे काम नाही, म्हणून हा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 04:54 PM2023-05-21T16:54:58+5:302023-05-21T16:55:36+5:30

how to clean copper vessels at home | Simple Trick to Clean Copper Utensils तांब्या पितळेची भांडी स्वच्छ चकाचक ठेवणे काही सोपे काम नाही, म्हणून हा खास उपाय

how to clean copper vessels at home | Simple Trick to Clean Copper Utensils | दिवाळीच्या उरलेल्या पणत्या वापरून करा तांब्या पितळेची भांडी चकाचक, १ मिनिटाचे सोपे काम

दिवाळीच्या उरलेल्या पणत्या वापरून करा तांब्या पितळेची भांडी चकाचक, १ मिनिटाचे सोपे काम

घरातील पुजेची किंवा वापरण्यात येणारी तांब्या - पितळ्याची भांडी लगेच काळी पडतात. सणवार जवळ आल्यानंतर आपण तांब्या - पितळ्याची भांडी वापरण्यास काढतो. त्याचा वापर झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून एका कोपऱ्यात ठेवतो. ही भांडी जास्त काळ तसेच ठेवल्यामुळे, त्यावर काळपट डाग दिसू लागतात. वारंवार घासूनही हवीशी भांड्यांना चमक येत नाही. हे डाग सहसा घासून निघत नाही.

काही प्रॉडक्ट्स किंवा चिंचेचा वापर करून ही भांडी घासल्यास, त्यावर तात्पुरती चमक येते. ही चमक दीर्घकाळ टिकत नाही. आपल्याला जर तांब्या - पितळ्याची भांडी कमी मेहनत घेऊन, न घासता घरच्या साहित्यात चमकवायची असेल तर, दिवाळीच्या पणत्यांचा वापर करा. दिवाळीच्या पणत्यांचा वापर केल्यामुळे तांब्या - पितळ्याची भांडी चकाचक स्वच्छ होतील. व नव्यासारखे चमकतील(how to clean copper vessels at home | Simple Trick to Clean Copper Utensils).

तांब्या - पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य

साध्या मातीच्या पणत्या

मीठ

स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक

लिंबाचा रस

अशा पद्धतीने चमकवा तांब्या - पितळ्याची भांडी

सर्वप्रथम, ४ ते ५ साध्या मातीच्या पणत्या घ्या, किसणीने त्यावर घासून त्याची पावडर तयार करून घ्या. ही माती एका वाटीत काढून घ्या. त्यात एक चमचा मीठ, लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा.

मला वेड लागले रील्स बघण्याचे! असं झालं असेल तर सावधान, मायग्रेनचा धोका आणि..

ही पेस्ट तयार झाल्यानंतर हातांच्या बोटांवर घ्या, तांब्या - पितळ्याच्या भांड्यांवर ही पेस्ट लावून हलक्या हाताने घासा. आपल्याला अधिक कष्ट घेऊन घासण्याची गरज नाही. या पेस्टमुळे भांड्यांवरील काळपटपणा निघून जातो. तयार पेस्टच्या मदतीने भांडी घासल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या पेस्टमुळे भांड्यांवरील काळपट डाग निघून जाईल. व भांडी नव्यासारखी चमकतील.

Web Title: how to clean copper vessels at home | Simple Trick to Clean Copper Utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.