Join us  

पडद्यांवर धूळ साचली-मळकट झालेत? रिंग न काढता पडदे धुण्याची १ ट्रिक, ५ मिनिटांत स्वच्छ होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 10:20 AM

How to clean curtains at home in easy steps (Parade kase clean karayche) : रिंग न काढता पडदे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी रिंगचा भाग एकत्र करून एका दोरीच्या साहाय्याने किंवा शूजच्या लेसने घट्ट बांधून घ्या.

खिडक्या दरवाज्यांच्या पडद्यांवर रोज धूळ बसल्यामुळे धाणीचे थर साचतात आणि धूळ जमा होते. (Diwali Cleaning Tips) पडद्यांवर साचलेली घाण, स्वच्छ करायला म्हटलं की रॉडमधून पडदे बाहेर काढावे लागतात. (How to clean curtains at home in easy steps) रिंग वेगळ्या कराव्या लागतात हे किचकट काम टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता.  जेणेकरून दिवाळीच्या वेळेस घरातील सर्व पडदे चकचकीत स्वच्छ दिसतील.  (How to Clean Curtains at Home)

रिंग न काढता पडदे कसे स्वच्छ करावेत?

रिंग न काढता पडदे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी रिंगचा भाग एकत्र करून एका दोरीच्या साहाय्याने किंवा शूजच्या लेसने घट्ट बांधून घ्या. नंतर पडदा वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी घाला किंवा बाथरूमध्ये हातानेही तुम्ही पडदे धुवू शकता.  काही सोप्या टिप्स तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. (How To Wash Curtains Without Removing Rings)

साध्या आहारातून प्रोटीन-कॅल्शियम हवंय? सकाळी उठल्यानंतर खा ५ पदार्थ: एनर्जेटिक-फिट राहाल

बेकिंग सोडा किंवा कॉर्न स्टार्च

पडद्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बेकींग सोडा किंवा कॉर्न स्टार्च घेऊन कपड्यांवर लावा आणि ६० मिनिटांसाठी डागांवर तसेच राहू द्य. बेकिंग सोडा डाग काढून टाकण्यास मदत करेल. यामुळे पडदे क्लिन दिसण्यास मदत होईल.

डिटर्जेंट

डिटर्जेंट एक असा पदार्थ आहे. ज्याच्या वापराने तुम्ही हट्टी डाग सहज काढून टाकू शकता. तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी डटर्जेंटची मदत घ्या.  नंतर टुथब्रशच्या मदतीने स्क्रब करा.  एक टॉवेल ओला करून डिटर्जेंट घालून धुवून घ्या. नंतर पडदे हवेत सुकण्यासाठी ठेवा. पडदे लवकर सुकवण्यासाठी तुम्ही ड्रायरचा वापरही करू शकता. 

थंड पाणी आणि क्लिनरचा वापर करा

खिडकीचे आणि दाराचे पडदे स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याच्या मिश्रणात क्लिनर घालून एक मिश्रण तयार करा. या मिश्रणात अर्धा तास पडदे भिजवण्यासाठी ठेवा. तुम्ही ब्लीचचे मिश्रण तयार करू शकता. एक तासाने ब्रशने घासून पडदे स्वच्छ करा. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्स