आपल्या घराच्या हॉलमध्ये एखादा छानसा गालिचा किंवा कार्पेट घातलं तर हॉलचा लूक नक्कीच बदलतो आणि आणखी छान दिसतो. त्यामुळे आपण मोठ्या हौशेने सुंदर गालिचा अंथरूण ठेवतो. पण कधी कधी गडबडीत आपल्याकडून त्यावर काहीतरी खरकटं सांडून जातं. घरात लहान मुलं असतील तर हमखास गालिचा घाण होतो. किंवा कधी घरी पाहुणे आले तर त्यांच्याकडून किंवा आपल्याकडूनही गडबडीत सांडलवंड होऊन जाते (How to clean dirty carpet?). अशा पद्धतीने खरकटं सांडून जर गालिचा खराब झाला असेल तर तो कसा स्वच्छ करायचा ते पाहून घ्या. कारण एवढा मोठा गालिचा धुणं काही शक्य नसतं. (simple tricks and tips to clean food stains on carpet)
गालिच्यावर काही सांडल्यास तो कसा स्वच्छ करावा?
गालिच्यावर काही खरकटं सांडलं तर तो कसा स्वच्छ करायच, याचा उपाय home_sattva या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
त्वचा कोरडी पडली- रोज काळजी घ्यायलाही वेळ नाही? करा फक्त ४ गोष्टी- त्वचा दिसेल सुंदर-तरुण
जर गालिच्यावर एखादा ओलसर पदार्थ सांडला तर सगळ्यात आधी तो पदार्थ तिथून पुसून घ्या. पदार्थ पुसून घेतला तरी त्याचे काही कण गालिच्याच्या फरमध्ये अडकून बसतात. त्यामुळे तो पदार्थ थोडा सुकू द्या.
यानंतर कपडे घासण्याचा जो ब्रश असतो, तो ब्रश त्या भागावरून फिरवा. असं केल्याने गालिच्याच्या फरमध्ये अडकलेले पदार्थांचे कण निघून जातील. पदार्थ ओलसर असताना जर तुम्ही असं केलं तर तो एवढा स्वच्छ होणार नाही.
यानंतर त्या जागेवर थोडा बेकिंग सोडा टाका आणि ७ ते ८ मिनिटे राहू द्या. एका पातेल्यात थोडं गरम पाणी घ्या. त्यात व्हिनेगर टाका. एखादा कॉटनचा स्वच्छ कपडा त्या पाण्यात बुडवा आणि थोडा पिळून घेऊन त्या कपड्याने ती जागा पुसून घ्या.
५ पदार्थ- केस गळणं थांबून होतील दाट- लांब
यानंतर कपड्यांसाठी असतं ते कंडिशनर पाण्यात कालवून पुन्हा गालिच्याची ती खराब झालेली जागा पुसून घ्या. यानंतर गालिचा उन्हामध्ये वाळवून घ्या. डाग अगदी स्वच्छ निघून जाईल.