Join us  

डोअरमॅट कळकट - खराब झालेत? २ टिप्स, काही मिनिटात डोअरमॅट होईल क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 8:57 PM

How to Clean Dirty Doormats at Home पायांची स्वच्छता डोअरमॅट करतो? पण डोअरमॅटचं काय? त्याला देखील स्वच्छ करायला हवे ना..

शेवटच्या वेळी तुम्ही डोअरमॅट पूर्णपणे स्वच्छ कधी केला होता? एक आठवड्यापूर्वी? एक महिन्यापूर्वी? की कधी स्वच्छ केलं हे आठवतच नाही.  प्रत्येकाच्या घरात डोअरमॅट असते. पाय पुसण्यासाठी डोअरमॅट हवाच. बाहेर गेल्यानंतर आपले पाय प्रचंड घाण होतात. पण डोअरमॅटमुळे ही घाण घरात पसरत नाही. किंवा फरशीला चिटकत नाही. पण आपण अनेकदा डोअरमॅटकडे दुर्लक्ष करतो.

बराच काळ डोअरमॅट न धुतल्यामुळे तो आणखी खराब होत जातो. त्यातील धूळ व माती घरात शिरते. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते. डोअरमॅट साफ करायला अनेकांना कंटाळा येतो. परंतु, कंटाळा करून चालणार नाही. जर आपल्याला काही मिनिटात घाणेरडे डोअरमॅट साफ करायचं असेल तर, या काही टिप्स फॉलो करून पाहा, या ट्रिक्समुळे डोअरमॅट नक्की क्लिन व नव्यासारखे दिसेल(How to Clean Dirty Doormats at Home).

घाणेरडे डोअरमॅट साफ कसे करायचे?

बहुतांश डोअरमॅट्स व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ होतात. त्यामधून घाण व धूळ सहज निघून जाते. पण डोअरमॅट्सचे देखील विविध प्रकार असतात. प्रत्येक प्रकारानुसार त्याची सफाई करायला हवी.

मला वेड लागले रील्स बघण्याचे! असं झालं असेल तर सावधान, मायग्रेनचा धोका आणि..

रबर बेस डोअरमॅट्स

रबर बेस डोअरमॅट्स वॉशिंग मशीनमध्ये धुतला जाऊ शकतो. परंतु तसे करण्यापूर्वी, मॅटच्या पॅकेटवरील साफसफाईच्या सूचना वाचा. सहसा हे मॅट, सौम्य डिटर्जंट व पाण्याच्या मदतीने स्वच्छ केले जाऊ शकतात. बहुतांश डोअरमॅट्सचा रंग उन्हात वाळवल्यानंतर फिका पडतो. त्यामुळे उन्हात न वाळवता पंख्याखाली वाळवा.

ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल

रश्शीपासून तयार डोअरमॅट्स(गोणी)

हे पारंपारिक डोअरमॅट नारळाच्या दोरीपासून तयार केला जातो. ज्याला आपण गोणी देखील म्हणतो. हे डोअरमॅट्स खूप टिकाऊ असतात. यासह ते अधिकाधिक पाणी देखील शोषून घेतात. हे डोअरमॅट्स व्हॅक्यूम क्लिनरने साफ करता येतात. याशिवाय कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा मिसळून पावडर तयार करा. ही पावडर डोअरमॅटवर पसरवा, व पाण्याच्या मदतीने डोअरमॅट क्लिन करा. यासाठी आपण डिटर्जंटचा वापर देखील करू शकता.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्ससोशल मीडिया