Lokmat Sakhi >Social Viral > किचनच्या तेलकट-मेणचट टाइल्स स्वच्छ करण्याची १ सोपी युक्ती, डाग होतील गायब-टाइल्स चकचकीत

किचनच्या तेलकट-मेणचट टाइल्स स्वच्छ करण्याची १ सोपी युक्ती, डाग होतील गायब-टाइल्स चकचकीत

How To Clean Dirty Kitchen Tiles Easy Remedy : घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने एक खास सोल्यूशन तयार केल्यास हा किचनमधला राप निघून येण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 12:59 PM2023-08-25T12:59:41+5:302023-08-25T14:33:12+5:30

How To Clean Dirty Kitchen Tiles Easy Remedy : घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने एक खास सोल्यूशन तयार केल्यास हा किचनमधला राप निघून येण्यास मदत होते.

How To Clean Dirty Kitchen Tiles Easy Remedy : 1 Easy Trick to Clean Sticky Kitchen Tiles; Layers of blistering, spots will be shiny | किचनच्या तेलकट-मेणचट टाइल्स स्वच्छ करण्याची १ सोपी युक्ती, डाग होतील गायब-टाइल्स चकचकीत

किचनच्या तेलकट-मेणचट टाइल्स स्वच्छ करण्याची १ सोपी युक्ती, डाग होतील गायब-टाइल्स चकचकीत

किचन म्हणजे ज्याठिकाणी सतत घरातील सगळ्यांचाच वावर असतो. स्वयंपाक करायचा म्हणून घरातील महिला याठिकाणी असतात. भूक लागली की खायला काय आहे म्हणून डबे उचकायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच याठिकाणी ये जा करतात आणि सकाळी झोपेतून उठल्यावरच्या चहापासून ते अगदी रात्री झोपताना घ्यायच्या दुधापर्यंतच्या सगळ्या गोष्टींसाठी आपण किचनमध्ये ये जा करत असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, डबे, गरमागरम नाश्ता हे सगळं तयार करणारं हे किचन वापर असल्याने चिकट होतं. अनेकदा भिंतीवर उडलेले, ओट्यावरचे चिकट डाग आणि थर इतके हट्टी असतात की ते घासले तरी निघत नाहीत (How To Clean Dirty Kitchen Tiles Easy Remedy). 

अशा या खराब झालेल्या ओट्यावर आणि टाइल्स पाहून आपल्याला या ठिकाणी काहीच करु आणि खाऊ नये असं होऊन जातं. अशावेळी वेळच्या वेळी गॅस शेगडी, ओटा, टाइल्स, ट्रॉली सगळं साफ करणं अतिशय  गरजेचं असतं. आता हे स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय वापरावं म्हणजे हे दिर्घकाळ स्वच्छ राहायला मदत होईल असा आपल्याला प्रश्न पडतो. तर बाजारात मिळणारी रेडीमेड सोल्यूशन वापरण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने एक खास सोल्यूशन तयार केल्यास हा किचनमधला राप निघून येण्यास मदत होते. हे सोल्यूशन कसा तयार करायचे पाहूया... 

१. कास्टीक सोडा घेऊन त्यामध्ये लिक्विड डीश वॉश आणि व्हिनेगर टाकावे. 

२. हे सगळे चांगले एकत्र करुन हँड ग्लोव्हजचा वापर करुन ते ते मिक्स करायचे.

३. कास्टीक सोड्याची ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने टाइल्सवर लावायची आणि साधारण २० ते ३० मिनीटांसाठी तशीच ठेवायची.

(Image : Google)
(Image : Google)

४. साधारण अर्धा तास झाला की स्क्रबर आणि ब्रशच्या मदतीने तुम्ही टाइल्स घासू शकता. सोड्यामुळे चिकटपणा आणि घाण झटपट निघण्यास मदत होईल. 

५. ही घाण साफ झाल्यावर डिटर्जंट किंवा लिक्विड डीश वॉशच्या मदतीने या टाइल्स साफ कराव्यात. 

६. सगळ्यात शेवटी एखाद्या सुती कपड्याने टाइल्स स्वच्छ पुसून घ्याव्यात. हे सगळे चांगले वाळल्यानंतरच याठिकाणी पुन्हा स्वयंपाक करावा. 
 

Web Title: How To Clean Dirty Kitchen Tiles Easy Remedy : 1 Easy Trick to Clean Sticky Kitchen Tiles; Layers of blistering, spots will be shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.