Join us  

फ्रिजच्या दरवाज्याचं रबर काळंकुट्ट मेणचट झालं? ३ पदार्थ वापरून 'अशी' करा झटपट स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 12:58 PM

Home Hacks: फ्रिजच्या दरवाज्याचं रबर अगदी काळं पडून जातं. ते कसं स्वच्छ करायचं ते पाहा...(how to clean dirty rubber of refrigerator door?)

ठळक मुद्देतुम्ही अगदी कमीत कमी वेळात फ्रिजच्या दरवाज्याचं रबर घासून चकाचक करू शकता. 

फ्रिज ही आपल्या अगदी दररोजच्या वापरातली वस्तू. आपण फ्रिजमध्ये अनेक अन्नपदार्थ ठेवतो. त्यामुळे ते खरंतर अतिशय स्वच्छ, चकाचक असणं गरजेचं आहे. पण तरीही बऱ्याचदा असं होतं की फ्रिजची स्वच्छता ठेवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. हे आपल्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आता बऱ्याचदा असं होतं की फ्रिजच्या आत लावलेल्या काचेच्या शेल्फ काढून आपण स्वच्छ करतो. पण त्याचवेळी दरवाज्याला लावलेल्या रबरकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं (how to clean dirty rubber of refrigerator door?). काही घरांमधल्या फ्रिजचं डोअर रबर तर अक्षरश: घाण साचून काळंकुट्ट पडलेलं असतं. ते कसं स्वच्छ करायचं ते पाहा...(simple and easy trick to clean fridge door rubber)

फ्रिजच्या दरवाज्याला लावलेलं रबर कसं स्वच्छ करायचं?

आपल्या फ्रिजचं तापमान आपण ज्या पद्धतीने ते सेट केलं आहे, तसंच कायम ठेवण्याचं काम फ्रिजच्या दरवाज्याला बसवलेलं रबर करतं.

पाठ काळवंडल्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायलाही नको वाटतं? ३ उपाय- पाठीवरचा मळ निघून जाईल

हे रबर जर थोडं सैल पडलं तर त्याचा परिणाम लगेच फ्रिजच्या आतल्या तापमानावर होतो आणि मग फ्रिज आपल्याला पाहिजे तसं स्वच्छ होत नाही. त्यामुळे ते रबर स्वच्छ करणं हे थोडं हळूवार पद्धतीने करण्याचं काम आहे.

सगळ्यात आधी तर फ्रिजचा मेन स्विच बंद करा. जेणेकरून विजेचा शॉक लागण्याचा धोका नाही. 

 

यानंतर एका वाटीमध्ये लिक्विड डिशवॉश, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाका. फ्रिजचं रबर आधी पाणी लावून थोडं ओलसर करून घ्या. त्यानंतर आपण वाटीमध्ये तयार केलेलं मिश्रण त्यावर टाका आणि ३ ते ४ मिनिटे तसंच राहू द्या.

स्वानंदी टिकेकर ते मुग्धा वैशंपायन- बघा पहिल्या मंगळागौरीसाठी हौशीने नटलेल्या मराठी सेलिब्रिटी

त्यानंतर वायरची घासणी घेऊन ते घासून काढा. या कामासाठी तारेची घासणी वापरू नका. नाहीतर रबराला चरे पडू शकतात. यानंतर पुन्हा त्यावर पाणी शिंपडा आणि रबर मऊ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या. 

अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमीत कमी वेळात फ्रिजच्या दरवाज्याचं रबर घासून चकाचक करू शकता. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीहोम अप्लायंस