Join us  

वॉश बेसिनवरचे पिवळे डाग निघता निघत नाहीत, १ सोपा उपाय-बेसिन चमकेल पांढरेशुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 9:50 AM

how to clean dirty white washbasin at home cleaning tips : घरच्या घरी क्लिनर तयार करुन बेसिन घासले तर ते नव्यासारखे चमकायला मदत होते

आपण सतत घराची स्वच्छता करत असतो तरी ते खराब होतेच. घरात लहान मुलं, जास्ती लोकं राहत असतील तर घर कितीही साफ केले तरी अगदी २-३ दिवसांत त्याची अवस्था होते. घराचा ज्याप्रमाणे केर काढून फरशी पुसतो. त्याचप्रमाणे आपण बाथरुम, टॉयलेट, वॉश बेसिन यांचीही साफसफाई करतो. अगदी रोजच्या रोज जमले नाही तरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी आपण हे सगळे स्वच्छ घासतोच. दात घासण्यासाठी, हात-तोंड धुण्यासाठी, पुरुष मंडळी दाढी करण्यासाठी वॉश बेसिनचा वापर करतात (how to clean dirty white washbasin at home cleaning tips). 

सततच्या वापराने बेसिन खराब होते. साधारणपणे या बेसिनचा रंग पांढरा असतो आणि वापराने त्याच्यावर पिवळा-काळा थर जमा व्हायला लागतो. बेसिन खराब झाले की आपल्याला तिथे तोंड धुवायला किंवा इतरही कोणत्याही गोष्टी करायला नको वाटते.  त्यामुळेच हे बेसिन स्वच्छ ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो. विकतचे एखादे टाइल्स क्लिनर वापरुन आपण बेसिन साफ करतो खरे पण त्याने ते म्हणावे तसे चमकतेच असे नाही. अशावेळी घरच्या घरी क्लिनर तयार करुन बेसिन घासले तर ते नव्यासारखे चमकायला मदत होते. पाहूयात बेसिन साफ करण्याची सोपी पद्धत... 

(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला शाम्पू १ चमचा घ्या

२. त्यानंतर यामध्ये १ पाऊच इनो आणि एका लिंबाचा रस घाला.

३. यामध्ये १ कप पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. 

४. सगळ्यात आधी बेसिनवर पाणी घालून ते थोडे ओले करुन घ्या.

(Image : Google)

५. मग हे तयार झालेले क्लिनर बेसिनवर सगळीकडे पसरवा. 

६. मग एखाद्या जुन्या टूथब्रशने हे मिश्रण सगळीकडे चांगले पसरुन घ्या.

७. यामुळे बेसिनवरचे डाग निघून जातील आणि बेसिन चमकायला लागेल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी