Lokmat Sakhi >Social Viral > नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

How to clean dust from new broom आता नव्या झाडूतील भुसा घरभर पसरणार नाही, २ टिप्स फॉलो करून तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 10:55 AM2023-08-18T10:55:18+5:302023-08-18T13:04:35+5:30

How to clean dust from new broom आता नव्या झाडूतील भुसा घरभर पसरणार नाही, २ टिप्स फॉलो करून तर पाहा

How to clean dust from new broom | नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू हवाच. झाडूशिवाय घरातील साफसफाई पूर्ण होऊच शकत नाही. संपूर्ण घराची साफ - सफाई एकट्या झाडूने केली जाऊ शकते. रोज सकाळी उठल्यानंतर, घरातील महिला झाडूने केर काढून पुढची कामे करण्यासाठी घेते. झाडूमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. जास्त वापरण्यात येणारा झाडू मध्यम आकाराचा असतो. ज्याला पकडण्यासाठी हँडल, व पुढे केर काढण्यासाठी सुक्या झाडांची पानं व काड्या लावलेले असतात.

वारंवार वापरल्याने झाडू जुना होतो. झाडांची पानं व काड्या तुटून पडतात. अशा वेळी आपण नवीन झाडू आणतो. नवीन झाडूमधून प्रचंड भुसा निघतो. झाडू मारताना तो भुसा घरभर पसरतो. हा भुसा काढण्यासाठी २ उपाय करून पाहा. काही मिनिटात झाडू स्वच्छ होईल(How to clean dust from new broom).

छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

झाडूमधून भुसा काढण्यासाठी पहिली टीप

सर्वप्रथम, नवीन झाडू दाराबाहेर झाडून घ्या. त्यातून अतिरिक्त भुसा निघेल. एक कंगवा घ्या. कंगवा मोठ्या दातांचा असेल याची खात्री करा. ज्याप्रमाणे आपण केस विंचरतो, त्याच प्रमाणे केर काढण्याची बाजू विंचरून घ्या. असे करत असताना झाडू गोल - गोल फिरवत जा. जेणेकरून संपूर्ण बाजूने भुसा निघेल. आपण मोठ्या दातांचा कंगवा वापरण्याऐवजी कपडे धुण्याचा ब्रश देखील घेऊ शकता. या ट्रिकमुळे भुसा काही मिनिटात निघून जाईल.

कपड्यावर तेल सांडले? कपडे न धुता १५ मिनिटांत तेलकट डाग काढण्याची सोपी युक्ती

झाडूमधून भुसा काढण्यासाठी दुसरी टीप

नवीन झाडू आणल्यानंतर दाराबाहेर झाडून घ्या. जेणेकरून त्यातील भुसा निघेल. एका मोठ्या बादलीत पाणी भरून घ्या. त्या पाण्यात झाडू तीन ते चार वेळा धुवून भिजत ठेवा. पाण्यामुळे झाडूतील भुसा निघून जाईल. व झाडू स्वच्छ होईल. ओला झालेला झाडू उन्हात वाळवत ठेवा. सुकल्यानंतर आपण झाडू वापरू शकता. या ट्रिकमुळे झाडूमधून भुसा निघून जाईल.

Web Title: How to clean dust from new broom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.