Join us

अजिबात न दमता २ मिनिटांत पंखा पुसण्याची १ सोपी ट्रिक, सिलिंग फॅन दिसेल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2023 17:57 IST

How to Clean Dusty Ceiling Fan in Two Minutes फरशीवर धूळ, झाडूचे फटके असा आटापिटा न करताही फॅन स्वच्छ पुसता येतो, त्यासाठीच ही खास ट्रिक

थंडी असो किवा गरमी प्रत्येक ऋतूत सिलिंग फॅनचा वापर होतो. सिलिंग फॅनमुळे घरात हवा खेळती राहते. काही लोकांना पंख्याची सवय असते. एक मिनिट जरी पंखा बंद असला तरी, जीव कासावीस होतो. पण पंख्याच्या अतिवापरामुळे सिलिंग फॅन्सच्या ब्लेड्सवर धूळ जमा होते. पंखा चालू केल्यानंतर धुळीचे हे कण घरभर पसरतात. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

आपण अनेकदा धुळीच्या याच कणांमुळे आजारी पडतो. त्यामुळे वेळोवेळी पंखा साफ करणे आवश्यक आहे. घाणेरडा, काळपट पडलेला पंखा साफ करणे काहींना खूप अवघड जाते. साफ करूनही पंख्यावरील डाग निघत नाही, अशा स्थितीत कोणत्या कापडाने पंखा साफ केल्याने सिलिंग फॅन लवकर क्लिन होईल हे पाहूयात(How to Clean Dusty Ceiling Fan in Two Minutes).

सिलिंग फॅन साफ करण्यासाठी सिंपल आयडिया

स्प्रे बॉटल

लिक्विड क्लीनर

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

उशी कव्हर

- सर्वप्रथम टेबलवर उभे राहून आपला हात सिलिंग फॅनपर्यंत नीट पोहोचतोय की नाही ते पाहा.

- आता पंखा साफ करण्यासाठी स्प्रे बॉटल, लिक्विड क्लीनर, व उशीचे कव्हर घ्या. पंखा साफ करताना केस टॉवेल किंवा एका कापडाने कव्हर करा. व डोळे देखील कव्हर करा. जेणेकरून डोळ्यात धूळ जाणार नाही.

- आता उशीच्या कव्हरचे तोंड पंख्याची पातीमध्ये घालून, अलगद हाताने धूळ सरकवून घ्यावी. जेणेकरून धूळ फरशीवर पडणार नाही. धूळ उशीच्या कव्हरमध्ये जमा होईल. साफ केल्यानंतर ही धूळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करा. व अश्या प्रकारे पंख्याच्या इतर पातीही साफ करून घ्या.

पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? ५ टिप्स, स्वच्छता राखा आणि आरोग्यही सांभाळा

- पंख्याची पाती साफ केल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड क्लीनर काढून घ्या, व लिक्विड क्लीनर पंख्यावर स्प्रे करा. त्यानंतर एका कापडाने पंखा स्वच्छ पुसून काढा. अशा प्रकारे पंखा काही मिनिटात स्वच्छ क्लिन होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल