Join us  

मोबाईल कव्हर कळकट झाले? ३ घरगुती टिप्स, डिझाईननुसार साफ करा कव्हर, दिसतील नव्यासारखे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 11:51 AM

3 Ways to Clean a Phone Case विविध डिझाईनचे मोबाईल कव्हर स्वच्छ करण्याचे काही सोप्या ट्रिक्स..

सध्या मोबाईल फोन प्रत्येकाकडे आहे. अंतराने लांब असलेल्या व्यक्तीला जोडण्याचं काम मोबाईल करते. आता स्मार्ट फोनचा जमाना आहे. बहुतांश जणांकडे स्मार्ट फोन आहे. स्मार्ट फोनद्वारे संवाद साधण्याव्यतिरिक्त, लोकं इंटरनेटद्वारे खूप काही शिकतात. काही स्मार्ट फोन प्रचंड नाजूक असतात. जमिनीवर पडले की, त्याचे दोन तुकडे झालेच म्हणून समजा. अशा वेळी त्याच्या संरक्षणासाठी आपण मोबाईलवर कव्हर आणि स्क्रीनगार्ड लावतो. यामुळे मोबाईलवर स्क्रॅच पडत नाही.

कालांतराने मोबाईल कव्हर लवकर खराब होतात. खासकरून पारदर्शक मोबाईल कव्हर लवकर खराब होतात. असे कव्हर पिवळे - काळपट पडतात. या खराब कव्हरमुळे स्मार्ट फोनची शोभा निघून जाते. जर आपण देखील या समस्येपासून त्रस्त असाल तर, काही घरगुती उपायांचा वापर करून पाहा. या उपायांमुळे मोबाईल कव्हर काही मिनिटात साफ होईल.

मोबाईल कव्हर साफ करण्याचे काही टिप्स

पारदर्शक कव्हर साफ करण्याची ट्रिक

पारदर्शक कव्हर साफ करण्यासाठी आपण मीठ आणि टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम, कव्हरवर टूथपेस्ट लावा. त्यानंतर ब्रश ओला करून घ्या, त्याच ब्रशने कव्हर घासून काढा. २ मिनिटांनंतर कव्हरवर मीठ शिंपडा, पुन्हा ब्रशने घासा. शेवटी पाण्याने धुवा. अशा प्रकारे मोबाईल कव्हर साफ होईल.

कलरफुल कव्हरला करा असे साफ..

कलरफुल कव्हर साफ करण्यासाठी सर्वप्रथम, कोमट पाण्यात १ चमचा लिक्विड सोप मिसळा. आता त्यात फोन कव्हर बुडवून ठेवा. हा कव्हर पाण्यात साधारण १५ मिनिटे ठेवा. यानंतर, टूथब्रशवर बेकिंग पावडर लावा, आणि त्याने कव्हर स्वच्छ घासून घ्या. २ मिनिटे तरी ब्रशने कव्हर घासा. त्यानंतर सामान्य पाण्याने कव्हर धुवून घ्या. या ट्रिकमुळे कव्हर साफ होईल. 

डिझायनर कव्हरला हाताने करा स्वच्छ

काही कव्हरवर डिझाईन असतात. जे ब्रशने साफ केल्यामुळे खराब होतात. यामुळे ब्रशची मदत न घेता, आपल्याला हे कव्हर हाताने साफ करावे लागतील. यासाठी १ चमचा लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये, १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा डिशवॉश लिक्विड मिसळा. आता हे मिश्रण फोनच्या कव्हरवर लावा.

आजही तेवढीच कातील आणि सुंदर दिसते जुही चावला, तिच्या निरागस सौंदर्याचे सिक्रेट आणि योगाभ्यासाची जादू..

हाताने हळूवारपणे कव्हर स्वच्छ करा. आता हलक्या ओल्या कापडाने कव्हर स्वच्छ करा. पाण्याने कव्हर धुवू नका. याने डिझाईन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे २ वेळा ओल्या कापडाने कव्हर स्वच्छ पुसून घ्या. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल