Lokmat Sakhi >Social Viral > डासांनी हैराण केलं? फरशी पुसताना पाण्यात घाला '१' गोष्ट; डास राहतील दूर-फरशीही चमकेल

डासांनी हैराण केलं? फरशी पुसताना पाण्यात घाला '१' गोष्ट; डास राहतील दूर-फरशीही चमकेल

How to Clean Every Type of Floor—and Keep It Spotless : लादी पुसताना पाण्यात मिसळा 'हा' पदार्थ, फरशीवरचे डाग होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 06:13 PM2024-04-16T18:13:49+5:302024-04-16T18:27:59+5:30

How to Clean Every Type of Floor—and Keep It Spotless : लादी पुसताना पाण्यात मिसळा 'हा' पदार्थ, फरशीवरचे डाग होतील गायब

How to Clean Every Type of Floor—and Keep It Spotless | डासांनी हैराण केलं? फरशी पुसताना पाण्यात घाला '१' गोष्ट; डास राहतील दूर-फरशीही चमकेल

डासांनी हैराण केलं? फरशी पुसताना पाण्यात घाला '१' गोष्ट; डास राहतील दूर-फरशीही चमकेल

आपलं घर स्वच्छ दिसावं असं प्रत्येकाला वाटतं (Cleaning Tips). घर स्वच्छ असेल तर, आजारांचा धोका कमी होतो. आपल्याला दररोज घराची सफाई करणं शक्य नाही. पण फरशी रोज पुसणं गरजेचं आहे (Floor Clean). काही लोक घरात स्लीपर घालतात, तर काही अनवाणी चालतात. काही वेळेला अन्न खाताना फरशीवर सांडते. किंवा घाणेरडे पाय घेऊन आपण घरभर फिरतो. दिसत नसले तरी फरशीवर अनेक किटाणू असतात. ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत.

घाणीच्या ठिकाणी डास फिरतात, आणि घरातही प्रवेश करतात. जर आपल्याला घरात डास आणि माश्या नको असतील तर, लादी पुसताना पाण्यात ३ गोष्टी मिसळा. यामुळे घरात डास आणि माश्या येणार नाही, शिवाय लादी कायम स्वच्छ आणि किटाणूही नष्ट होतील(How to Clean Every Type of Floor—and Keep It Spotless).

व्हिनेगर

लादी पुसताना आपण पाण्यात व्हिनेगर मिक्स करू शकता. व्हिनेगरच्या वापराने फरशी पुसल्याने, डास दूर राहतात. याचा गंध तीव्र असतो, ज्यामुळे डास घराबाहेर पळ काढतील. आपण याच्या वापराने नियमित फरशी पुसू शकता.

'निराश आहात, ऑफिसला येऊ नका' कारण..एका कंपनीचा महत्वाचा निर्णय; केली 'अनहॅपी लिव्ह'ची घोषणा

इसेंशियल ऑइल

एसेंशियल ऑईलचा वापर करून आपण फरशी पुसू शकता. यामुळे फरशी सुगंधित राहील, आणि त्यावरचे किटाणूही नष्ट होतील. यासाठी पाण्यात लॅव्हेंडर ऑईल किंवा पेपरमिंट ऑईल मिक्स करा. नंतर त्याने फरशी पुसून काढा. एसेंशियल ऑईलच्या गंधामुळे घरात डास येणार नाही.

दालचिनीचं पाणी

दालचिनीच्या पाण्याचा वापर करून आपण फरशी पुसू शकता. यासाठी कोमट पाण्यात दालचिनीचं पाणी मिक्स करा. नंतर या पाण्याने फरशी पुसा. या पाण्यामुळे माश्या आणि डास दूर होतील. शिवाय फरशीही क्लिन राहील.

ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

डिश वॉश लिक्विड

डिशवॉशर सोपच्या मदतीने आपण फरशी स्वच्छ करू शकता. यासाठी पाण्यात थोडं डिशवॉशर सोप लिक्विड मिक्स करा, आणि या पाण्याने फरशी स्वच्छ करा. जर फरशी अधिक चिकट झाली असेल तर, आपण लिक्वीड सोप आणि व्हिनेगरच्या वापराने फरशी क्लिन करू शकता. यामुळे घर कायम स्वच्छ आणि फरशीही चमकेल. 

Web Title: How to Clean Every Type of Floor—and Keep It Spotless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.