Lokmat Sakhi >Social Viral > ५ मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा; टेबल, खुर्चीची गरजच नाही, पंखा दिसेल नवाकोरा

५ मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा; टेबल, खुर्चीची गरजच नाही, पंखा दिसेल नवाकोरा

How to Clean Fan Smartly in 5 Minutes : पंखा स्वच्छ करण्यासाठी वर टेबलावर उभं राहणं सोपं नसतं. खाली पडण्याची भिती नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:11 PM2023-01-02T16:11:49+5:302023-01-02T16:31:28+5:30

How to Clean Fan Smartly in 5 Minutes : पंखा स्वच्छ करण्यासाठी वर टेबलावर उभं राहणं सोपं नसतं. खाली पडण्याची भिती नसते.

How to Clean Fan Smartly in 5 Minutes : What is the easiest way to clean a fan | ५ मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा; टेबल, खुर्चीची गरजच नाही, पंखा दिसेल नवाकोरा

५ मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा; टेबल, खुर्चीची गरजच नाही, पंखा दिसेल नवाकोरा

अनेकदा गरमीच्या दिवसात पंखे सुरू असतात पण हवा व्यवस्थित लागत नाही. रोज पंख्याच्या वापरामुळे त्यात धूळ जमा होते. पण कामाच्या गडबडीत पंखा (Ceiling Fan) स्वच्छ  करायला जमत नाही. घाण जमा झाल्यानं पंखे खराब होतात आणि घराची शोभा बिघडते. (Cleaning Tips & Hacks)) पंखा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही छतावरील पंखे सहज स्वच्छ ठेवू शकता. (What is the easiest way to clean a fan)



१) पहिली पद्धत

पंखा स्वच्छ करण्यासाठी वर टेबलावर उभं राहणं  सोपं नसतं. खाली पडण्याची भिती नसते. म्हणून पंख्याचे ब्लेड वेगवेगळे उघडून वेगवेगळे स्वच्छ करा. पंख्याचे ब्लेड्स स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात पावडर किंवा कपडे धुण्याचा साबण मिसळून त्या पाण्यानं पंखा स्वच्छ करा. (How do you clean a fan without taking it apart)  

२) दुसरी पद्धत

उशीचे जुने कव्हर घेऊन त्यानं पंखा व्यवस्थित झाकून टाका. आता पंख्याच्या ब्लेडला बंद कव्हरच्या वरून हाताने घासून घ्या. तिन्ही ब्लेड अशा प्रकारे स्वच्छ करा. तुम्ही पंखा सहज स्वच्छ कराल आणि धूळ कव्हरच्या आतच पडेल. तुमची खोलीही स्वच्छ होईल.

३) तिसरी पद्धत

तुम्ही जूना शर्ट किंवा टिशर्ट पंखा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. शर्टाचे हात पंख्याच्या ब्लेडमध्ये घालून बाहेरील बाजूनं स्वच्छ करा. या पद्धतीनं २ मिनिटात पंखा स्वच्छ होईल.

४) चौथी पद्धत

पंखा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मॉपचा वापर करू शकता. मॉप पाण्यात बूडवून पिळून घेतल्यानंतर छोट्या स्टूलवर उभं राहून पुसून घ्या. 

अशी घ्या काळजी

पंखा स्वच्छ करताना संपूर्ण घरात धूळ पसरते. पंखा साफ करताना चादरीच्या साहाय्याने बेड किंवा फर्निचर झाकून ठेवा. यामुळे तुमचे काम वाढणार नाही आणि पंख्याची धूळ त्यावर पडेल जी तुम्ही बाहेर जाऊन धूळ झटकू शकता. 

Web Title: How to Clean Fan Smartly in 5 Minutes : What is the easiest way to clean a fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.