Lokmat Sakhi >Social Viral > कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

1 Simple Home Remedy For Glossy And Shiny Floor Tiles: घरातल्या फरशा पिवळसर, काळपट पडल्या असतील तर त्या स्वच्छ चमकदार करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा.. (How to clean stains on floor?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 12:09 PM2023-12-27T12:09:12+5:302023-12-27T12:11:23+5:30

1 Simple Home Remedy For Glossy And Shiny Floor Tiles: घरातल्या फरशा पिवळसर, काळपट पडल्या असतील तर त्या स्वच्छ चमकदार करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा.. (How to clean stains on floor?)

How to clean floor tiles, 1 simple home remedy for glossy and shiny floor tiles, How to make floor tiles shine brightly? How to clean stains on floor? | कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

Highlightsफरशांची चमक खूपच गेलेली असेल तर २ ते ३ वेळा हा उपाय करा. लगेचच फरक तुमच्या लक्षात येईल

घरातल्या फरशा जर पांढरट किंवा माेतीया रंगाच्या असतील तर त्या फरशांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण आता घर म्हटलं की फरशीवर सतत काहीतरी सांडते- पडते आणि फरशी खराब होते. शिवाय बऱ्याचदा दोन फरशांच्या मधल्या गॅपमध्येही घाण अडकत जाते आणि ती जागा काळपट, पिवळट पडत जाते. अशा फरशा मग कितीही पुसल्या तरी स्वच्छ दिसत नाहीत (How to clean floor tiles?). त्यांच्यावरची चमक गेल्यासारखी वाटते. म्हणूनच अशा फरशा स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा नव्यासारखं चमकविण्यासाठी  (1 simple home remedy for glossy and shiny floor tiles)आता हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा...(How to clean stains on floor?)

 

फरशा चमकदार करण्यासाठी उपाय

फरशा स्वच्छ चमकदार करण्यासाठी ग्लिसरीन अतिशय उपयुक्त ठरते. आपल्याला माहितीच आहे की अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये ग्लिसरीनचा वापर केला जातो. हेच ग्लिसरिन आता फरशांना नवी चमक आणण्यासाठी कसं वापरायचं ते पाहा.

बर्कलीच्या कॉलेजमध्ये ह्रतिक- सुजैनच्या मुलाचा डंका, लेकाचं यश पाहून कौतुकाने सुजैन म्हणाली....

अर्धी बादली पाणी घ्या. त्या पाण्यात २ ते ३ टेबलस्पून ग्लिसरीन टाका. आता या पाण्यात फरशी पुसण्याचे इतर कोणतेही लिक्विड टाकू नका. या पाण्याने घराच्या फरशा पुसून काढा. फरशांची चमक खूपच गेलेली असेल तर २ ते ३ वेळा हा उपाय करा. लगेचच फरक तुमच्या लक्षात येईल आणि घरातल्या फरशा पुन्हा चमकदार झालेल्या दिसून येतील.

 

हे उपायही करून पाहा 

फरशी पुसण्याच्या पाण्यात ३ ते ४ टेबलस्पून लिंबाचा रस घाला आणि त्या पाण्याने फरशी पुसा. फरशीवर नवी चमक येईल. लिंबू नसेल तर एखादा टेबलस्पून व्हिनेगर घातलं तरी चालेल.

केस नॅचरली स्ट्रेट करण्याचा सोपा उपाय, फक्त २ पदार्थ लावा, केस होतील सिल्की- चमकदार

बेकिंग सोडा आणि मीठ यांचा वापर करूनही फरशांना चमकदार करता येते. 

 

Web Title: How to clean floor tiles, 1 simple home remedy for glossy and shiny floor tiles, How to make floor tiles shine brightly? How to clean stains on floor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.