स्वयंपाकघरात आपण विविध प्रकारच्या भांड्यांचा वापर करतो (Cleaning Tips). स्वयंपाक घराला शोभा भांड्यांमुळे येते. भांड्यामध्ये आपण नियमित पॅनचा वापर करतो. पॅनमध्ये आपण चपात्या, भाकरी आणि पराठे तयार करतो (Gas burner). सततच्या वापरामुळे पॅन आणि गॅस बर्नर खराब होतात (Pan). पॅन आणि गॅस बर्नरचा वापर नियमित होतो. ज्यामुळे ते लगेच काळपट होतात.
घासणीने घासूनही बऱ्याचदा पॅन आणि गॅस बर्नरचा काळपटपणा निघत नाही. यामुळे वेळ वाया जातो आणि मेहनतही जास्त लागते. जर पॅन आणि गॅस बर्नरचा काळेपणा निघत नसेल, तर काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे काही मिनिटात पॅन आणि गॅस बर्नरचा काळेपणा निघून जाईल. शिवाय मेहनत आणि वेळेचीही बचत होईल(How to Clean Gas Burner and Pan Easily at Home).
पॅन स्वच्छ करण्यासाठी उपाय
सर्व प्रथम, गॅस चालू करा आणि त्यावर पॅन ठेवा. एक तुरटी घ्या, आता या तव्याला तुरटीने चांगले घासून घ्या. तुरटीने घासल्यानंतर पॅन पाण्यात ठेवा. आता चमच्याने खरवडून पॅन स्वच्छ करा. किंवा आपण घसणीचा देखील वापर करू शकता.
नंतर पॅन गॅसवर ठेवा. त्यावर पाणी घाला. त्यात थोडे मीठही घाला. काही वेळानंतर पॅन स्वच्छ झालेला दिसेल. नंतर डिश वॉशने आपण पॅन क्लिन करू शकता.
सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी टिप्स
बऱ्याचदा गॅस बर्नरमुळे गॅस वाया जातो. ज्यामुळे गॅस सिलेंडरमधून गॅस संपले असे वाटते. अशावेळी गॅस बर्नर क्लिन करणं गरजेचं आहे. गॅस बर्नर साफ करणं अनेकांना अवघड काम वाटतं. पण आपण मेहनत न घेता बर्नर क्लिन करू शकता. यासाठी बर्नरवर आधी बेकिंग सोडा शिंपडा. नंतर लिंबाच्या सालीने बर्नर स्वच्छ करा. यामुळे बर्नर काही मिनिटात स्वच्छ होईल.